शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमधील युतीच्या मनोमिलनाला लक्ष्मण जगताप अनुपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 18:18 IST

शिवसेनचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यातील मनभेद जाहीर आहेत. युतीच्या आज झालेल्या बैठकीला लक्ष्मण जगताप यांनी अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघ निवडणूकीसाठी शिवसेना व भारतीय जनता पक्षाची उमेदवार जाहिर झालेला नाही. शिवसेनचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यातील मनभेद जाहीर आहेत. युतीच्या आज झालेल्या बैठकीला लक्ष्मण जगताप यांनी अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

‘बाहेर गावी असल्याने शहराध्यक्ष जगताप उपस्थित नसल्याचे सांगून पालकमंत्री गिरीश बापट यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.शिवसेना-भाजपमधील कटुता संपल्याचे युतीचे राज्यस्तरीय नेते सांगत असले तरी पिंपरी-चिंचवडमधीलभाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांचे मनोमिलन झाले नसल्याचे दिसून येत आहे. पिंपरी, चिंचवड आणि मावळ मतदार संघातील भाजप-शिवसेना पदाधिका-यांची आकुर्डीत बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेना उपनेत्या नीलम गो-हे, महापौर राहुल जाधव,  खासदार  अमर साबळे, भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष, आमदार बाळा भेगडे, शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, जिल्हाप्रमुख मावळ गजानन चिंचवडे, महापालिकेतील पक्षनेते एकनाथ पवार आदी उपस्थित होते. यावेळी  ‘‘शिवसेना-भाजपचे भांडण नव्हते. दोन्ही पक्षांनी ताकद वाढविली. त्यात काहीही गैर नाही. शरद पवार, अजित पवार, पार्थ पवार, स्वार्थ, परमार्थ कोणीही येऊ देत. आपल्याला काहीच फरक पडत नाही. पण गाफील राहयाचे नाही, असेही बापट यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

युतीच्या मनोमिलनाला खोडा...लोकसभा निवडणूकीसाठी युती झाली असली तरी मावळमधील खासदार बारणे आणि भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यात मनोमिलन होणार का? याबाबतची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली आहे. भाजपाने मावळवर दावाही केला आहे. तसेच आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यातच युतीच्या बैठकीस जगताप अनुपस्थित होते. याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांना विचारले असता, ‘‘वैयक्तिक कामानिमित्त शहराध्यक्ष बाहेर गावी गेले आहे. याची कल्पना त्यांनी आम्हाला दिली होती. त्यामुळे ते अनुपस्थित आहेत.’’ 

टॅग्स :BJPभाजपाgirish bapatगिरीष बापटpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड