वकिलाचा मोबाइल केला लंपास

By Admin | Updated: June 5, 2016 03:48 IST2016-06-05T03:48:42+5:302016-06-05T03:48:42+5:30

लालटोपीनगरमध्ये राहणाऱ्या एका मद्यपीने ओळखीच्या वकिलांकडे मोबाइल मागितला. कोणाशी तरी संपर्क साधण्याचे कारण पुढे करून मोबाइल मागत असल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी

Lawyer's mobile banana lumpas | वकिलाचा मोबाइल केला लंपास

वकिलाचा मोबाइल केला लंपास

पिंपरी : लालटोपीनगरमध्ये राहणाऱ्या एका मद्यपीने ओळखीच्या वकिलांकडे मोबाइल मागितला. कोणाशी तरी संपर्क साधण्याचे कारण पुढे करून मोबाइल मागत असल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी वकिलाने मोबाइल देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने धक्का मारून वकिलाकडील मोबाइल पळवून नेला. दहा हजार पाचशे रुपये किमतीचा मोबाइल पळवून नेल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांकडे वकिलाने फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सयाजी वाळुंज (वय ४७, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) आणि आरोपी विश्वजीत रमेश जोशी (लालटोपीनगर, मोरवाडी) हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. न्यायालयाच्या आवारात थांबलेले असताना, आरोपी तेथे आला. आरोपी मद्यप्राशन करून असल्याने त्यांनी मोबाइल देण्यास नकार दिला. परंतु आरोपीने त्यांना धक्का मारला. मोबाइल खाली पडताच त्याने पळवला. (प्रतिनिधी)

Web Title: Lawyer's mobile banana lumpas