कॅन्टोन्मेट संकेतस्थळावर गतवर्षीच्या सुट्यांची यादी
By Admin | Updated: January 24, 2017 02:02 IST2017-01-24T02:02:12+5:302017-01-24T02:02:12+5:30
सन २०१७ हे नवीन वर्ष सुरू होऊन २३ दिवस उलटले असतानाही देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संकेतस्थळावर मात्र, सन २०१६ च्या

कॅन्टोन्मेट संकेतस्थळावर गतवर्षीच्या सुट्यांची यादी
देहूरोड : सन २०१७ हे नवीन वर्ष सुरू होऊन २३ दिवस उलटले असतानाही देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संकेतस्थळावर मात्र, सन २०१६ च्या शासकीय सुट्यांची यादी झळकत आहे. त्यामुळे सन २०१७ मधील शासकीय सुट्यांची यादी कधी उपलब्ध होणार असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रशासन भागातील सुट्यांचे शीर्षक असून त्यावर क्लिक केले असता, अद्यापही शासनाने जाहीर केलेल्या २०१६ च्या शासकीय सुट्यांची यादी झळकत आहे. नवीन वर्ष सुरू होऊन २३ दिवस उलटले असताना बोर्डाच्या प्रशासन विभागाने २०१७ची यादी संकेतस्थळावर जाहीर न केल्याचे स्पष्ट झाले आहे. बोर्डाच्या हद्दीतील नागरिकांच्या माहितीसाठी प्रशासनाने संकेतस्थळावर व बोर्डाच्या सूचना फलकावर तातडीने नवीन वर्षातील शासकीय सुट्यांची यादी उपलब्ध करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (वार्ताहर)