शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ladki bahin yojana : ‘लाडक्या बहिणी’ योजनेतून कमी करण्याचा डाव कोणाचा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 13:49 IST

- नवीन केवायसीची प्रक्रिया बंद; पण अधिकृत घोषणा नाही, ‘ओटीपी’ आणि ‘सर्व्हर’च्या खेळखंडोब्यात केवायसी रखडलेली; तांत्रिक कारणामुळे पात्र महिला लाभापासून वंचित राहण्याची भीती, केवायसीमुळे किती महिला वगळल्याची आकडेवारीच नाही

- आकाश झगडे 

पिंपरी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षांनी केला. मात्र, लाभार्थी महिला तांत्रिक पेचात अडकल्या आहेत. योजनेचा लाभ बंद होऊ शकतो, या भीतीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मात्र, पोर्टलवर नवीन केवायसीसाठीचे दरवाजे बंद आहेत. त्यामुळे दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न आहे.

ज्या महिलांच्या अर्जात काही त्रुटी होत्या किंवा ज्यांची प्रक्रिया आधी चुकली होती, केवळ त्यांनाच दुरुस्ती करण्याची संधी दिली जात आहे. मात्र, ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया झालेलीच नाही, त्यांच्यासाठी पोर्टलवर पर्याय उपलब्ध करून दिला नाही. सुरुवातीस ओटीपी न येणे, संकेतस्थळ सातत्याने हँग होणे किंवा तांत्रिक बाबींमुळे अनेक महिलांची केवायसी अपूर्ण राहिली होती. ३१ डिसेंबर २०२४ अंतिम मुदत दिली होती. शेवटच्या टप्प्यात संकेतस्थळ अनेकदा बंद पडली होती. या सर्व कारणामुळे अनेक पात्र महिलांची केवायसी रखडलेली आहे. त्यानंतर ३१ मार्च २०२५ पर्यंत जुन्या केवायसीसाठी दुरुस्तीची अंतिम मुदत दिली आहे. आता नवीन केवायसी होत नसल्याने केवायसी रखडलेल्या बहिणींनी करायचे काय, असा प्रश्न आहे.

प्रशासनाकडून माहितीची लपवाछपवी?

याबाबत स्थानिक प्रशासनाकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे. किती महिलांनी अर्ज केले, किती जणींची ई-केवायसी पूर्ण झाली, किती महिलांना प्रक्रियेतून वगळण्यात आले, याबाबतची कोणतीही अधिकृत आकडेवारी प्रशासनाकडून मिळाली नाही.

सुरुवातीला अर्ज भरताना 'ओटीपी' येत नव्हता. आता जेव्हा प्रक्रिया व्यवस्थित होईल असे वाटले, तेव्हा पोर्टलच बंद झाले आहे. सायबर कॅफेमध्ये गेल्यावर सांगतात की नवीन केवायसी होत नाही. तांत्रिक अडचणीत अडकलेल्या बहिणींना मदतीचा हात देण्याऐवजी दरवाजेच बंद केले आहेत. प्रशासनाने आम्हाला मुद्दाम लाभापासून लांब ठेवण्यासाठीच हा खेळ मांडला आहे का? असा प्रश्न पडतो.  - पूजा भोसले, लाभार्थी महिला 

English
हिंदी सारांश
Web Title : Ladki Bahin Yojana: Is someone trying to reduce beneficiaries?

Web Summary : Beneficiaries of Ladki Bahin Yojana face e-KYC hurdles, fearing loss of benefits. Portal access is restricted, preventing new KYC completion. Women allege deliberate exclusion due to technical issues and lack of administrative transparency.
टॅग्स :Puneपुणेladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड