किवळेत मजूर महिलेचा खून; धारदार शस्त्रानं वार करून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 23:29 IST2021-09-16T23:29:26+5:302021-09-16T23:29:36+5:30

धारदार शास्त्राने डोक्यात वार करून मजूर महिलेचा निर्घृण खून

laborer women killed in pimpari | किवळेत मजूर महिलेचा खून; धारदार शस्त्रानं वार करून हत्या

किवळेत मजूर महिलेचा खून; धारदार शस्त्रानं वार करून हत्या

पिंपरी : धारदार शास्त्राने डोक्यात वार करून मजूर महिलेचा निर्घृण खून केला. किवळे येथे गुरुवारी (दि. १६) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. सौदव सोमेरू उरव (वय ४०, सध्या रा. किवळे, मूळ रा. पश्चिम बंगाल), असे खून झालेल्या मजूर महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला पतीसह किवळे येथे राहत होती. तिचा भाचा देखील त्यांच्यासोबत राहत होता. गुरुवारी सकाळी पती आणि भाचा नेहमीप्रमाणे कामावर गेले. त्यानंतर महिला देखील जवळच असलेल्या बांधकाम साईटवर कामाला गेली. दरम्यान, सायंकाळी महिला कामावरून घरी आली नसल्याने पतीने जाऊन पाहणी केली असता महिलेचा खून झाल्याचे समोर आले.

Web Title: laborer women killed in pimpari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.