शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी 'आयर्नमॅन' कृष्णप्रकाश यांची वर्णी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 21:38 IST

संदीप बिष्णोई यांची बदली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची बदली झाली असून, आयपीएस अधिकारी ते आयर्नमॅन, अल्ट्रामॅनचा किताब पटकाविलेले कृष्ण प्रकाश यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे. मुंबई येथे पोलीस महासंचालक कार्यालयात विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) म्हणून सध्या ते कार्यरत आहेत.   राज्यातील आयपीएस अधिकाºयांच्या बदल्या झाल्याची चर्चा बुधवारी दिवसभर सुरू होती. त्यात पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची बदली होऊन आयर्नमॅन कृष्ण प्रकाश यांची शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून वर्णी लागल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या. याबाबत रात्री उशिरा अधिकृत अध्यादेश जारी झाले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय १५ आॅगस्ट २०१८ रोजी कार्यान्वित झाले. त्यावेळी शहराचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून आर. के. पद्मनाभन यांनी पदभार स्वीकारून तोकड्या मनुष्यबळावर कामकाज सुरू केले. २० सप्टेंबर २०१९ रोजी संदीप बिष्णोई यांची शहराच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली. त्यांनी २१ सप्टेंबर २०१९ रोजी आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली. त्याच दिवशी राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाली होती. बिष्णोई यांचा आयुक्त म्हणून एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत असतानाच कृष्ण प्रकाश यांची पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदी बदली झाली. शहराचे तिसरे पोलीस आयुक्त म्हणून कृष्ण प्रकाश यांच्याकडे जबाबदारी आली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसcommissionerआयुक्तTransferबदली