खरालवाडीत कार्यकर्त्याचा खून

By Admin | Updated: April 9, 2017 23:57 IST2017-04-09T23:57:10+5:302017-04-09T23:57:10+5:30

महापालिकेच्या निवडणुकीतील वादातून खराळवाडी, पिंपरी येथे एका कार्यकर्त्यांच्या डोक्यात दगड घालून खून

Kharalwadi worker's blood | खरालवाडीत कार्यकर्त्याचा खून

खरालवाडीत कार्यकर्त्याचा खून

 पिंपरी, दि. 9 - महापालिकेच्या निवडणुकीतील वादातून खराळवाडी, पिंपरी येथे एका कार्यकर्त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.सुहास हाळदनकर (32, रा. खराळवाडी) असे मृत्यू झालेल्या कार्यकार्त्याचे  नाव आहे. 

रविवारी रात्री खराळवाडी येथील एका राजकीय नेत्यांच्या कार्यलयासमोर हा प्रकार घडला. या प्रकारामुळे पिंपरी येथील यशवतराव चव्हाण रुग्णालयात मोठ्या संख्येने पोलिस, राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त जमा झाले आहेत.मृतदेह वाय सी एम् रुग्णालयात नेण्यात आला, तेथे कार्यकार्त्यांची मोठी गर्दी जमली आहे, खराळवाडी भागात दगड़फेकसुधा झाली. ताणावाची परिस्थिति निर्माण झाल्याने मोठा पोलीस फ़ौजफाटा घटनास्थली दाखल झाला आहे

Web Title: Kharalwadi worker's blood