कामशेत : शहरातील छावा चौकामध्ये राकेश सुदाम वाळुंज (वय २४, रा. छावा चौक, कामशेत) यांच्यावर बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करण्यात आला. याप्रकरणी योगेश सचिन खंडागळे (रा. छावा चौक, कामशेत) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश वाळुंज हे सासरवाडीला जात असताना त्यांच्या घराजवळ राहणारा योगेश खंडागळे पाठीमागून आला. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी खंडागळे याने कमरेला अडकविलेले चॉपरसारखे हत्यार काढून डोक्यात वार केले. वाळुंज वार अडवीत असताना त्याने हातावर, पोटावर चॉपरने वार केले. त्यांच्यावर कामशेतमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच राकेश यांना वाचविण्यास आलेल्या त्यांच्या पत्नीच्या हातावर मारुन ढकलण्यात आले व शिवीगाळ करून दमदाटी केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे तपास करीत आहेत.
कामशेतमध्ये एकावर धारधार शस्त्राने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 02:51 IST