अपक्षांच्या गटनेतेपदी कैलास बारणे
By Admin | Updated: March 23, 2017 04:25 IST2017-03-23T04:25:47+5:302017-03-23T04:25:47+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या पाच अपक्ष नगरसेवकांच्या गटाची मंगळवारी विभागीय आयुक्तांकडे नोंदणी

अपक्षांच्या गटनेतेपदी कैलास बारणे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या पाच अपक्ष नगरसेवकांच्या गटाची मंगळवारी विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली. अपक्षांच्या गटनेतेपदी कैलास बारणे यांची निवड करण्यात आली आहे.
महापालिकेच्या १२८ जागांपैकी भाजपाने ७७ जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली, तर ३६ जागा मिळविणारी राष्ट्रवादी काँगे्रस दुसऱ्या क्रमांकावर राहिली. यासह शिवसेना ९, मनसे १ आणि अपक्ष पाच जण निवडून आले. अपक्षांमध्ये बारणे यांच्यासह साधना मळेकर, नीता पाडाळे, नवनाथ जगताप, झामाबाई बारणे यांचा समावेश आहे.
या पाच जणांच्या गटाने मंगळवारी अपक्षांच्या स्वतंत्र गटाची नोंदणी केली असल्याची माहिती बारणे यांनी दिली. (प्रतिनिधी)