धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद

By Admin | Updated: June 26, 2016 04:45 IST2016-06-26T04:45:06+5:302016-06-26T04:45:06+5:30

लोणावळा शहरात शुक्रवारी पावसाचे आगमन झाल्याचे समजताच शनिवारी पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. सहारा पुलाजवळील धबधबा दुपारनंतर

The joy of wetting under the waterfalls | धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद

धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद

लोणावळा : लोणावळा शहरात शुक्रवारी पावसाचे आगमन झाल्याचे समजताच शनिवारी पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. सहारा पुलाजवळील धबधबा दुपारनंतर वाहू लागल्याने या धबधब्याखाली भिजण्याचा पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटला.
मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या मॉन्सूनने शुक्रवारी लोणावळा, खंडाळ्यासह मावळात सर्वत्र दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. शुक्रवारी सुरू झालेली पावसाची संततधार शनिवारीही कायम राहिल्याने डोंगरांवरून धबधबे वाहू लागले आहेत. भुशी धरणाच्या पातळीतही वाढ झाली आहे.
शनिवार व रविवारच्या सुटीचे औचित्य साधत लोणावळ्यात सकाळपासूनच पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यात दिवसभर वाहतूककोंडी झाली होती. लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव हे कर्मचाऱ्यासह वाहतूककोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत होते.
पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे भुशी धरण व लायन्स पॉइंटच्या दिशेने जात होते. रस्त्याच्या कडेला दिसेल त्या लहान-मोठ्या धबधब्यांखाली पर्यटक भिजण्याचा आनंद घेत होते. युवकांच्या समूहांबरोबर कुटुंबासहही अनेक पर्यटक लोणावळ्यात आले होते. (वार्ताहर)

शहरातील अंतर्गत रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी भुशी धरण व लायन्स पॉइंट परिसरातून परतीच्या मार्गावर येणारी वाहने रायवूड येथून खंडाळा रेल्वे गेटमार्गे राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात आली होती. सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी गर्दी केली होती.

Web Title: The joy of wetting under the waterfalls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.