जोडी नंबर एकमध्ये सासू-सुनांची धमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2016 00:37 IST2016-02-03T00:37:21+5:302016-02-03T00:37:21+5:30
एरवी सासू-सुना म्हटलं की, सर्वांच्या भुवया उंचावतात. मात्र याच सासू-सुनांनी ‘लोकमत’ सखी मंचाच्या व्यासपीठावर एकमेकींसोबत नृत्य,

जोडी नंबर एकमध्ये सासू-सुनांची धमाल
पिंपरी : एरवी सासू-सुना म्हटलं की, सर्वांच्या भुवया उंचावतात. मात्र याच सासू-सुनांनी ‘लोकमत’ सखी मंचाच्या व्यासपीठावर एकमेकींसोबत नृत्य, एकमेकींची स्तुती, सासू-सुनांची मॅचिंग ड्रेपरी व एकमेकींसोबत बिनधास्त प्रश्नोत्तराने कार्यक्रमाला रंगत आली.
‘लोकमत’ सखी मंच व अर्नेस्ट ग्रुप आयोजित ‘जोडी नंबर१’ या कार्यक्रमात सासू-सुनांच्या अतूट नात्यांचे प्रसंग पाहायला मिळाले. प्रकृति जियो फ्रेश आयुर्वेदिक शॉपी हे भेटवस्तू प्रायोजक होते. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मंगळवारी झालेल्या सासू-सुनांच्या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. सासू-सुनांच्या विशेष सादरीकरणाला शिट्ट्या व टाळ्यांची दाद मिळाली.
प्रथम बिनधास्त फेरीमध्ये सासू-सुनांनी एकमेकींचा गमतीदार परिचय करून दिला. यामध्ये एकूण सासू-सुनांच्या ११ जोड्या सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक जोडीच्या चेहऱ्यावर प्रत्येक फेरीला वेगळा आनंद दिसत होता. एकमेकींना पाठिंबा देत प्रत्येक फेरी दोघींनी गाठली.
परफेक्ट मॅचिंग फेरीत महाराष्ट्रीय संस्कृतीचा नऊवारी पेहराव काही सखींनी परिधान केला होता. तर काही सख्या मॅचिंग साड्या व ड्रेस घालून आल्या होत्या. तसेच सादरीकरण फेरीतही सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मध्ये सखींनी कविता उखाणे, नृत्य सादर केले. यामध्ये अलका व प्राची करवंदे या जोडीने पिंगा गं पोरी पिंगा... या गाण्यावर नृत्य सादर केले तर नहार या जोडीने कविता सादर केली. काही सखींनी गाणे म्हटले. उत्कृष्ट असा पाळणाही गायला.
अंतिम प्रश्नोत्तराच्या फेरीत मात्र सासू-सुनांची चांगलीच फि रकी घेतली. परीक्षकांनी चांगलेच प्रश्न स्पर्धकांना विचारले. सुनेचे चांगले गुण कोणते, नृत्य करण्यासाठी तुम्ही पाठिंबा द्याल का, कुटुंब व्यवस्थेबद्दल काय मत आहे.., सासूला काही समस्या भेडसावत असतील तर काय कराल, अशा अनेक आव्हानात्मक प्रश्नांना सासू-सुनांनी अगदी समर्पक उत्तरे दिली.
गतवर्षी घेण्यात आलेल्या सुवर्णसखी पिंपरी-चिंचवड लकी ड्रॉ बंपर योजनेतील विजेते पुढीलप्रमाणे- वर्षा जाधव, मंगल पाटील, माधुरी आव्हाड, परवीन शेख, अंजू बावनकुळे, उज्ज्वला गुरू, निशा परब, शोभा खावटे, ऊर्मिला करंजवर यांनी बाजी मारली. मोरया स्कूल आॅफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या मुलांनी ‘राहो में काँटे हैं... चिटियाँ कलाइया वे...डिस्को दिवाने...’ या गाण्यांवर विशेष नृत्य सादर केले.
सुभाष यादव याने विनोदात्मक शैलीनेमनोरंजन केले. उमा पाटील, सारिका सत्तूर, सचिन दाभाडे यांनी परीक्षण केले. अर्नेस्ट ग्रुपचे गुणवंत जाधव व प्रकृती जियो फे्रशचे दिलीप धोंडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)