जयश्री गावडे भाजपाच्या वाटेवर?

By Admin | Updated: January 11, 2017 03:09 IST2017-01-11T03:09:41+5:302017-01-11T03:09:41+5:30

काँगे्रसच्या नगरसेविका जयश्री गावडे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. जयश्री गावडे

Jayashree Gawde on the way to BJP? | जयश्री गावडे भाजपाच्या वाटेवर?

जयश्री गावडे भाजपाच्या वाटेवर?

पिंपरी : काँगे्रसच्या नगरसेविका जयश्री गावडे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. जयश्री गावडे यांचे पती वसंत गावडे यांनी यापूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्या भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काँगे्रसच्या सात नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश केला आहे. आता गावडे यांनीही काँग्रेसला राम राम ठोकल्याने काँगे्रसच्या नगरसेवकांची संख्या आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकी झाली आहे.
जयश्री गावडे म्हणाल्या की, काँगे्रसला शहरात नेतृत्व राहिलेले नाही. पक्ष संघटनेच्या वाढीच्या दृष्टीने कसलेही प्रयत्न केले जात नाहीत. आपण प्राथमिक सदस्यत्वासह नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Jayashree Gawde on the way to BJP?