गावोगावी देवीचा जागर

By Admin | Updated: October 14, 2015 03:21 IST2015-10-14T03:21:44+5:302015-10-14T03:21:44+5:30

खंडाळा घाटमाथ्यावरील वाघजई देवीच्या मुखवट्यांची मंगळवारी खंडाळा ग्रामस्थ व वाघजई देवी ट्रस्ट यांच्या वतीने खंडाळा गावातून मंदिरापर्यंत ढोल-ताशाच्या निनादामध्ये

Jaggivi Goddess Jagar | गावोगावी देवीचा जागर

गावोगावी देवीचा जागर

लोणावळा : खंडाळा घाटमाथ्यावरील वाघजई देवीच्या मुखवट्यांची मंगळवारी खंडाळा ग्रामस्थ व वाघजई देवी ट्रस्ट यांच्या वतीने खंडाळा गावातून मंदिरापर्यंत ढोल-ताशाच्या निनादामध्ये मिरवणूक काढत दुपारी साडेबारा वाजता लोणावळ्याचे पोलीस निरीक्षक आय़ एस़ पाटील यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली़ देवस्थान समितीच्या वतीने जुना राष्ट्रीय महामार्ग ते वाघजई देवी मंदिरापर्यत आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसविण्यात आली आहे़
यासह नवरात्रीचे नऊ दिवस देवस्थान समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे़ सालाबादप्रमाणे या वर्षीदेखील घटस्थापनेनंतर समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा सत्कार झाला. लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, राजू बच्चे, भाजपाचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, बाळासाहेब जाधव, नगरसेवक संजय गायकवाड, भालचंद्र खराडे, सुभाष सोनवणे, अ‍ॅड़ साहेबराव टकले, श्रीधर पुजारी, सुरेखा जाधव, रचना सिनकर, सुरेखा लांघे, फि लोमिना कचरे, चंद्रकांत लांघे, शिवराम बडेकर, चंद्रकांत कचरे, सीताराम कचरे, कोंडिराम कचरे, नरेंद्र कचरे, श्याम दाभाडे उपस्थित होते़
उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष प्रशांत पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले, तर विजय सिनकर यांनी सर्वांचे आभार मानले़ (वार्ताहर)

Web Title: Jaggivi Goddess Jagar