शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

टार्गेट अन् डेडलाइनच्या जाळ्यात गुरफटताहेत आयटीयन्स, वाढत्या आत्महत्या ही चिंतेची बाब  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 04:00 IST

गेल्या १० वर्षांत आयटीचे माहेरघर अशी पुण्याची नवीन ओळख बनली. देशातील सर्वाधिक आयटी इंडस्ट्री पुण्यात विस्तारली. उच्च लाईफ स्टाईल, गलेलठ्ठ पॅकेज यामुळे अनेक तरुण आयटीकडे आकर्षित होत आहेत.

वाकड : गेल्या १० वर्षांत आयटीचे माहेरघर अशी पुण्याची नवीन ओळख बनली. देशातील सर्वाधिक आयटी इंडस्ट्री पुण्यात विस्तारली. उच्च लाईफ स्टाईल, गलेलठ्ठ पॅकेज यामुळे अनेक तरुण आयटीकडे आकर्षित होत आहेत. अतिशय झगमगाटातील या दुनियेत काम करणारे आयटी अभियंते मात्र गेल्या दोन वर्षांपासून प्रचंड तणावाखाली असल्याचे वास्तव आहे. वाढत्या तणावातून अलीकडच्या काळात अनेक आयटीयन्सनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या ही चिंतेची बाब बनली आहे.आयटीत रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या; मात्र अलीकडच्या १० वर्षांत परिस्थितीत खूप बदल झाला आहे. बाहेरून पंचतारांकित, ग्लॅमरस वाटणारी आयटीची ही दुनिया अभियंत्यांसाठी सध्या तरी असुरक्षित असल्याचे वास्तव आहे. टार्गेट, शेअर रिसोर्स, डेडलाइनच्या ओझ्याखाली युवक चाचपडत असल्याने या जाचाला आणि तणावाला वैतागून अनेक अभियंते नैराश्याच्या प्रभावाखाली जात आहेत.बदलती जीवनशैली - बहुतेक आयटीयन्सचे भावविश्व संगणकाभोवतीच फिरते. सर्वाधिक वेळ लॅपटॉप, संगणक, मोबाइल यात घालवतात. त्यामुळेच हळूहळू त्यांची जीवनशैली बदलू लागते. रात्री उशिरा येणे, वाट्टेल ते व्यसन करणे, भौतिक सुखाची आस बाळगणे, खर्च करणे, वातावरणात काम करताना, तसेच मित्रांच्या आणि परिसराशी जुळवून घेताना महागडे कपडे, फॅशन, चैनीच्या वस्तू वापरण्याकडे त्यांचा कल वाढतो.नोकरीच्या ठिकाणी घर घेण्याची धडपड - आयटीत जॉब म्हणजे स्टेटस बनले आहे. त्यामुळे स्टेटस जपण्यासाठी किंवा अपेक्षांच्या ओझ्याखाली नोकरीच्या भरवशावर जेथे कंपनी आहे तेथेच फ्लॅट घेण्याचा आटापिटा ही मंडळी करतात. यातूनच अवाजवी कर्ज, क्रेडिट कार्डाचा अतिवापर यामुळे खर्चाची बाजू फुगते.नोकरी टिकविण्यासाठी स्पर्धा - आयटी क्षेत्रात पूर्वीसारखी कामाची शाश्वती नसल्याने काम टिकविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु झाली आहे. अनुषंगाने क्लायंट प्रेशर, कामाची डेडलाइन यांचा ताण असतोच. त्यातच पूर्वी एखाद्या किचकट प्रोजेक्टला इतर अभियंते मदत करायचे; आता मात्र तसे नाही. तो किचकट प्रोजेक्टदेखील एकट्यानेच आणि वेळेत पूर्ण करायचा, अशी अट आहे.अपग्रेड आणि अपडेटचा अभाव - आयटीतील टेक्नॉलॉजीत सातत्याने प्रचंड आधुनिककरण होत आहे. मात्र, आयटीयन्सकडे पूर्वापार चालत आलेले जुने एज्युकेशन आहे. ते काळाची पावले ओळखून अपग्रेड आणि अपडेट राहत नाहीत. त्यामुळे या फिल्डमध्ये तग धरणे कठीण होत चालले आहे.वाढती व्यसनाधीनता - कुटुंबापासून दूर आणि कोणाच्याही अधिपत्याखाली न राहता स्वच्छंद आणि मनसोक्त लाईफ जगण्याची सवयच जणूकाही तरुण-तरुणींना लागलेली असते. त्यामुळे ते सेल्फ मॅनेजमेंट न करता, कशाचीही काळजी न करता विरंगुळा आणि करमणूक म्हणून पावले व्यसनाकडे वळतात.डिप्रेशनमधून आत्महत्याआयटीचा डोलारा आणि फुगा जेवढा आपल्याला मोठा दिसतो. त्या मानाने ही इंडस्ट्री तेवढीच असुरक्षित आहे. धावपळ, स्पर्धा यांच्या पाचवीला पुजलेली असते. सतत टार्गेट आणि डेडलाइन या जाळ्यात हे गुरफटलेले असतात. एखादे काम वेळेत पूर्ण न झाल्यास काम थांबविण्याची टांगती तलवार असते. त्यामुळे स्वत:च्या रिलेशनशिपकडे, घराकडे लक्ष देता येत नाही. यातूनच कोठेतरी हा वर्ग डिप्रेशनमध्ये जातो आणि असे टोकाचे पाऊल उचलले जाते.- डॉ. धनंजय अष्ठुळकर (मानसोपचार तज्ज्ञ)काळाची पावले ओळखून स्वत:तबदल करावासातत्याने आयटी इंडस्ट्रीत मोठा बदल होत आहे. नवनवीन टेक्नॉलॉजी येत आहे. त्यानुसार तुम्ही जुने सोडून स्वत:मध्ये नवीन टेक्नॉलॉजी अपग्रेड आणि अपडेट केली पाहिजे. काळाची पावले ओळखून त्यानुसार स्वत:मध्ये बदल करण्याला पर्याय नाही.- अनिल पटवर्धन, मॅनेजिंग कमिटी मेंबर आॅफ एचआयएपॅकेजची अनिश्चितता - सात-आठ वर्षांपूर्वी आयटी इंडस्ट्रीत कामाचा अनुभव नसला, तरी पॅकेज चांगले मिळायचे. मात्र आता फ्रेशरला सुमारे २० ते ३० च्या दरम्यान (मंथली), तर अनुभवी अभियंत्यांना ३५ ते ८०च्या आसपास असते.वाढलेल्या अपेक्षांचे ओझे - आयटीत जॉब म्हटले, की मुलांकडून आई-वडिलांच्या अपेक्षा प्रचंड वाढतात. त्यांना वाटते आता आपली परस्थिती पालटणार, आपल्याला चांगले दिवस येणार; मात्र या अपेक्षा बहुतेक मुले पूर्ण करू शकत नसल्याने कुठेतरी नाराजी, निराशा वाढत आहे.आॅफर लेटरमध्ये नसते हमी - एखादी आयटी कंपनी संकटात असली, तर तुम्हाला टर्मिनेट करण्याचा अधिकार कंपनीला आहे, असे ठळक नियम आॅफर लेटरवर असतात.नकार पचवता न येणे -अविवाहित आणि पास आउट होऊन नुकतेच जॉबला लागलेल्या तरुणांचे नैराश्यामधून आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक आहे. बहुतेक ही फ्रेशर मुले प्रेमात असतात आणि समोरील मुलीने अथवा मुलाने नकार दिला तो पचविणे त्यांना अवघड जाते. कॉलेज लाईफ आणि आयटीत नोकरी यात प्रचंड तफावत : सर्वजण कॉलेज लाईफ मजा-मस्ती करत फुल टू धमाल करून अतिशय खेळीमेळीने दिवस घालवतात. मात्र कॉलेज आणि आयटीतील नोकरी या दोन आयुष्यांत प्रचंड तफावत आहे. येथील प्रोफेशनलपणा आणि दबाव काहींना सहन होत नाही.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र