शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आयटीयन्सना नियमांचे वावडे, हिंजवडी वाहतूक पोलिसांची कारवाई, तब्बल पंधरा लाख त्र्याऐंशी हजारांचा एकूण दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 3:30 AM

हिंजवडी, वाकड व ताथवडे परिसरातील आयटीयन्सना वाहतूक नियमांचे वावडे असल्याचे समोर आले आहे. हिंजवडी वाहतूक विभागाने केवळ ११ महिन्यांत विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट, लेन कटिंगच्या ४३१४ वाहनांवर कारवाई केली आहे.

- बेलाजी पात्रेवाकड : हिंजवडी, वाकड व ताथवडे परिसरातील आयटीयन्सना वाहतूक नियमांचे वावडे असल्याचे समोर आले आहे. हिंजवडी वाहतूक विभागाने केवळ ११ महिन्यांत विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट, लेन कटिंगच्या ४३१४ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक आयटीयन्सची संख्या असून, तब्बल पंधरा लाख त्र्याऐंशी हजारांचा दंड वसूल केला.शहराच्या विविध भागातून हिंजवडीमधील आयटी कंपन्यांत अभियंते रोज ये -जा करतात. त्यामध्ये दुचाकींवरून प्रवास करणारांची संख्या मोठी आहे. या भागात पर्यायी रस्ता नसल्याने रोज सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडीला समोरे जावे लागत आहेत. त्यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने कोंडीत भर पडत आहे.हिंजवडी पोलिसांनी जानेवारी ते नोव्हेंबर २०१७ पर्यंत २ हजार २९८ विनाहेल्मेट दुचाकीधारकांवर कारवाई करण्यात आली. तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एवढेच नव्हे, तर याच ११ महिन्यांत सीट बेल्ट न वापरणाºया १३५१ चारचाकी वाहन चालकांवर कारवाई करून २ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर लेन कटिंग करून वाहतूक नियम मोडणाºया २६५ कारवाईत ५३ हजार रुपयांचा दंड जमा झाला. त्यात डिसेंबरमधील कारवाईचा आकडा धरल्यास ही संख्या खूप पुढे जाईल, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.रोज दीडशेजणांना दंडहिंजवडीत सरासरी दररोज १० ते १३ कारवाई केवळ हेल्मेट न घालणाºया वाहनचालकांवर होते. तर सीट बेल्ट, लेन कटिंग, नो पार्किंग, मोबाईल टॉकिंग, कागदपत्रे न बाळगणे, रॉँग साइडने वाहन चालविणे, प्रिंटेड काचा, लायसन्स जवळ न बाळगणे, डी.डी, अवैध प्रवासी वाहतूक, नो एंट्री यासह अन्य अशा सुमारे १४० ते १५०च्या आसपास कारवाई केवळ आयटी पार्कच्या हिंजवडी परिसरात होते. या प्रत्येक वाहतूक नियमांच्या कारवाईसाठी एका कर्मचाºयाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक कारवाई विभागून देण्यात आल्याने एखाद्या कारवाईच्या शेवटपर्यंत सर्व कार्यवाही त्या संबंधित कर्मचाºयाने जबाबदारी पार पडायची, असे नियोजन आहे.सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊसहिंजवडीत वाहतूक समस्या काही काळापुरती का होईना झाल्यास त्याचे पडसाद सोशल मीडियावर अधिक उमटतात. लगेच ट्विटर, फेसबुक, व्हॉट्स अप, इंस्टाग्राम, मेल यावर चर्चेला उधाण येते, तर तक्रारींचा पाऊस पडतो. हिंजवडीतील खास वाहतूक समस्येसाठी काही आयटीयन्स तरुण-तरुणींनी एकत्र येत व्हॉट्स अप, ट्विटरवर ग्रुप तयार केले आहेत. त्यावर मध्यंतरी सह्यांची मोहीमदेखील राबविण्यात आली. तर प्रशासकीय-शासकीय आणि संबंधित मंत्र्यांना देखील ही सर्व मंडळी सोशल मीडियातून जाब विचारतात.जनजागृतीसाठी पुढाकारहिंजवडीत सुमारे सव्वाशे आयटी कंपन्या, तसेच इंजिनिअरिंग, फार्मास्युटिकल व अन्य पकडून १७०० कंपन्या आहेत. यात काम करणारे सुमारे दोन लाख ३० हजार आयटीयन्स आणि इतर कामगार पकडून किमान तीन लाखांच्या वर हा आकडा जातो.वाहतूककोंडी नित्याचीसुमारे ४० ते ५० टक्के लोक कंपनीच्या कॅब, बस, मेट्रो झिप, सार्वजनिक व खासगी वाहतूक व्यवस्थेद्वारे प्रवास करतात. मात्र उरलेले किमान ५० टक्के म्हणजेच जवळपास दीड लाख प्रवासी दुचाकी वा कारने प्रवास करतात. त्यामुळे वाहतूककोंडी नित्याची झाली आहे.फ्लेक्सद्वारे जनजागृतीगेल्या आठवड्यापासून हिंजवडी वाहतूक विभाग वाहतूक जनजागृती अभियान राबवत आहे. या अंतर्गत हिंजवडीतील महत्त्वाच्या २५ चौकांत वाहतूक नियम सांगणारे चित्रासह फ्लेक्स लागले असून, यांसह कंपन्यांतून जनजागृती सुरू आहे.आयटीयन्सनी सहनशीलता ठेवावीहिंजवडी परिसरात सकाळ-सायंकाळी दोन वेळेस एक बाजूचा रस्ता ओसंडून वाहतो. थोडे फार जॅमिंग झाले, तर लगेच विरुद्ध दिशेने वाहने घातली जातात. तसे न करता थोडी सहनशीलता ठेवावी. गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊ लागली आहे. आयटीयन्सनी थोडा धीर व सहनशीलता ठेवल्यास कोंडी कमी होण्यास मदत होईल.- दत्तात्रय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग हिंजवडी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड