शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
2
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
3
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
4
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
5
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
6
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
7
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
8
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
9
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
10
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
11
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
12
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
13
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
14
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
15
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
16
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
17
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
18
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
19
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
20
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळाली रोजगाराची संधी; कुशल मनुष्यबळाला कंपन्यांकडून मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 07:25 IST

लॉकडाऊनमध्ये दिलासा! २५ कंपन्यांनी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, म्हणून आयटीआयकडे विचारणा केली आहे.

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोरवाडी व कासारवाडी येथे आयटीआय

नारायण बडगुजर 

पिंपरी : लॉकडाऊनच्या काळात हजारो हात बेरोजगार झाले. त्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आयटीआयवाल्यांना लॉकडाऊनमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. उद्योगनगरीतील २५ कंपन्यांनी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, म्हणून महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे (आयटीआय) विचारणा केली आहे. त्यानुसार संबंधित कंपन्यांना दोन हजार प्रशिक्षित कामगारांबाबत आयटीआयकडून माहिती देण्यात आली असून, त्यातील शेकडो विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोरवाडी व कासारवाडी येथे आयटीआय आहे. या दोन्ही आयटीआयच्या माध्यमातून २० व्यवसायांचे (ट्रेड) अभ्यासक्रम व प्रशिक्षण दिले जाते. यातील नऊ ट्रेड एक वर्षाचे तर उर्वरित ११ ट्रेडचा कालावधी दोन वर्षांचा आहे. मोरवाडीतील आयटीआयमध्ये १४ ट्रेड असून त्यासाठी ७८४ तर कासारवाडी येथील महिला आयटीआयमध्ये सहा ट्रेड असून ११० प्रशिक्षणार्थ्यांना अशा ८९४ जणांना दरवर्षी प्रवेश दिला जातो. यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शहर व परिसरातील औद्योगिक आस्थापनांमध्ये संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थी-शिक्षकांचे व्हॉटसअप ग्रुप आहेत. कोणत्या कंपनीत पदभरती आहे, त्यांचे वेतन, सुविधा कोणत्या ट्रेडसाठी संधी आहेत याबाबत माहिती या ग्रुपवरून दिली जाते. त्यामुळे संबंधित प्रशिक्षणार्थी कंपनीकडे संपर्क साधतात.

कंपन्यांच्या मनुष्यबळ विकास विभागाचे प्रतिनिधी आयटीआयकडे संपर्क साधतात. त्यांच्या आवश्यकतेनुसार कुशल मनुष्यबळाची माहिती आयटीआयकडून त्यांना दिली जाते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्याचे नाव, त्याचा ट्रेड, संपर्क क्रमांक आदी माहिती उपलब्ध करून देण्यात येते. त्यानंतर संबंधित कंपनीकडून थेट प्रशिक्षणार्थ्याशु संपर्क साधला जातो. त्यानंतर पदभरतीची प्रक्रिया सुरू केली जाते.

परप्रांतीय मजूर गावी गेल्याचा परिणामकोरोनामुळे पिंपरी-चिंचवड, तळेगाव, टाकवे, चाकण, हिंजवडी-माण आदी एमआयडीसी परिसरातील लाखो परप्रांतीय कामगार त्यांच्या मूळ गावी परतले. दरम्यान लॉकडाऊन शिथिल होऊन औद्योगिक आस्थापना पुन्हा सुरु झाल्या. मात्र, कुशल मनुष्यबळ नसल्याने त्यांना फटका बसला आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही आस्थापनांनी पदभरतीची माहिती देऊन मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, म्हणून आयटीआयकडे विचारणा केली. यात सूक्ष्म, लघू उद्योग तसेच राष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. या माध्यमातून प्रशिक्षणार्थीना रोजगार संधी मिळत आहेत.- शशिकांत पाटील, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडiti collegeआयटीआय कॉलेजStudentविद्यार्थीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसLabourकामगार