शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

आम्ही पॉझिटिव्ह झालो तरी चालेल; पण महापालिकेच्या सभागृहात येणारच ; पिंपरीत विरोधी पक्ष आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 14:06 IST

आम्ही पॉझिटिव्ह झालो. तरी, चालेल  सभागृहात येणार; पिंपरीत विरोधक आक्रमक...

पिंपरी : महापालिका सभेत सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी धारेवर धरले. आम्ही पॉझिटीव्ह झालो. तरी, चालेल पण सभागृहात येणार आहोत. यापुढे ऑनलाईन सभा चालू देणार नाही,  असा इशाराही विरोधकांनी दिला.

महापालिका सभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. सभागृहातून सभा होत असतानाही कोणत्या उपसूचना दिल्या जातात हे कळत नव्हते. लक्षात येवू दिले जात नाही. तर, आॅनलाईन सभेच्या माध्यमातून काही घोटाळे केले जातील हे आम्हाला कळणार नाही. आम्हाला जनतेने निवडून दिले आहे. त्यांचे प्रश्न सभागृहात मांडणे आमचे कर्तव्य आहे, अशा भावना व्यक्त केल्या.विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, ‘‘कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. त्यामुळे  ही सभा सभागृहात मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित घेतली असती तरी चालले असते. माहे एप्रिल महिन्याची विशेष सभा दिनांक ३० एप्रिल रोजी घेतली तेव्हा कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती. तेव्हा मात्र, ही सभा सभागृहात सभा घेतली. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये घेण्यात यावी. म्हणजे सर्वांना या सभेत भाग घेऊन आपली मते मांडता येतील.’’ भाजपच्या आशा शेंडगे म्हणाल्या, ‘‘आॅनलाईन सभेमुळे असंख्य अडचणी येत आहे. काही समजत नाही. त्यामध्ये तांत्रिक त्रुटी आहेत. त्या दूर करणे आवश्यक आहे.’’

शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ‘‘आॅनलाईन सभेत कोण काय बोलतय हे कळत नव्हते. आवाजही व्यवस्थित येत नव्हता. याबाबत तांत्रिक अडचणी दूर करायला हवेत.’’

मनसे गटनेते सचिन चिखले म्हणाले, ‘‘ऑनलाईन सभेत अनेक अडथळे आले. विषय समजत नव्हते. तसेच महापौर काय बोलताहेत हे आमच्यापर्यंत पोहोचत नव्हते. त्यामुळे ऑनलाईन सभेतील त्रुटी दूर कराव्यात.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना