पिंपरी-चिंचवड महापालिका आयटीआयच्या अभ्यासक्रमांसाठी पाच कोटींचे टूल खरेदी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 04:04 PM2020-01-04T16:04:32+5:302020-01-04T16:20:11+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू

It will purchase five crore tools for ITI courses by pimpri corporation | पिंपरी-चिंचवड महापालिका आयटीआयच्या अभ्यासक्रमांसाठी पाच कोटींचे टूल खरेदी करणार

पिंपरी-चिंचवड महापालिका आयटीआयच्या अभ्यासक्रमांसाठी पाच कोटींचे टूल खरेदी करणार

Next
ठळक मुद्देरेफ्रिजीरेटर अभ्यासक्रमासाठी ५ कोटींचे टूल किटया व्यवसाय अभ्यासक्रमाचे नूतनीकरण करण्यात येणारया साहित्यासाठी महापालिकेने ४ कोटी ९९ लाख रुपये अंदाजपत्रकीय दर सादर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रेफ्रिजीरेटर आणि वातानुकूलित मॅकेनिक व्यवसाय अभ्यासक्रमासाठी साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. विविध प्रकारचे टूल किटसाठी सुमारे ४ कोटी ७० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केली आहे. या आयटीआयमध्ये विविध अभ्यासक्रमांसह रेफ्रिजीरेटर आणि वातानुकूलित यंत्रणा, मॅकेनिक व्यवसाय अभ्यासक्रमही शिकविला जात आहे. या व्यवसाय अभ्यासक्रमाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी संस्थेला टूल्स किट, इक्विपमेंट आणि यंत्रणा आदी विविध साहित्यांची आवश्यकता आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका मध्यवर्ती भांडार विभागातर्फे ई-निविदा प्रसिद्ध केली होती. या साहित्यासाठी महापालिकेने ४ कोटी ९९ लाख रुपये अंदाजपत्रकीय दर सादर केला होता. त्यावर साकेत एंटरप्राईजेस, इंद्रनिल टेक्नॉलॉजी आणि सी. सी. इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या. त्यातील सर्वाधिक कमी दराची म्हणजे ५.७६ टक्के कमी दराची निविदा इंद्रनिल टेक्नॉलॉजी या संस्थेने सादर केली.त्यांनी आयटीआयमधील रेफ्रिजीरेटर अँड  एअर कंडिशनिंग मॅकेनिक व्यवसाय अभ्यासक्रमासाठी आवश्यक विविध प्रकारच टूल्स किट, इक्विपमेंट आणि मशिनरी आदी विविध साहित्य ४ कोटी ७० लाख २२ हजार ७०४ रुपयांमध्ये देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनच करारनामा करण्यात येणार असून, आवश्यक विविध प्रकारचे टूल किट खरेदी करण्यात येणार आहे.

Web Title: It will purchase five crore tools for ITI courses by pimpri corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.