शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad: अपहरणकर्त्यांनीच अपहृताला नेले पोलिस ठाण्यात; पिंपरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 12:06 IST

पिंपरी येथे रविवारी (दि. ९) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली...

पिंपरी : चारजणांनी तरुणाचे अपहरण केले. त्यानंतर मारहाण करून अपहरणकर्त्यांनीच तरुणाला पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी अपहरणकर्त्यांना अटक केली. पिंपरी येथे रविवारी (दि. ९) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.

सागर सुरेशकुमार यादव (वय २४) असे अपहरण आणि सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुरेशकुमार यादव यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. योगेश राजेंद्र जगताप (वय ३९, रा. पिंपरी), राहुल तुकाराम जगताप (वय ५०, रा. चिंचवड), अमित तुकाराम जगताप (वय ४८, रा. चिंचवड), विजय चंद्रकांत माने (वय ३९, रा. पिंपरी) यांना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची पिंपरीगाव येथे वडापावची गाडी आहे. एका चारचाकी वाहनामधून आरोपी फिर्यादीच्या वडापावच्या गाडीजवळ आले. तेथे फिर्यादीचा मुलगा सागर याला मारहाण करून पिंपळे सौदागरच्या दिशेने घेऊन गेले. तेथे पुन्हा मारहाण करून आरोपींनी सागर याला पिंपरी पोलिस ठाण्यात घेऊन गेले, असे फिर्यादीत नमूद आहे. अपहरणकर्त्यांनीच अपहरण झालेल्या तरुणाला पोलिसांसमोर हजर केल्याने खळबळ उडाली. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpimpri-acपिंपरीCrime Newsगुन्हेगारी