सोनसाखळी हिसकावणारी इराणी टोळी जेरबंद

By Admin | Updated: June 1, 2017 02:23 IST2017-06-01T02:23:06+5:302017-06-01T02:23:06+5:30

शहरात दहशत पसरवत सोनसाखळी चोरणाऱ्या इराणी टोळीला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्यावर

Irani gang rattles sneezing | सोनसाखळी हिसकावणारी इराणी टोळी जेरबंद

सोनसाखळी हिसकावणारी इराणी टोळी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : शहरात दहशत पसरवत सोनसाखळी चोरणाऱ्या इराणी टोळीला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली. या टोळीत अल्पवयीन मुले सक्रिय असल्याची माहिती पुढे आली असून, त्यांनाही ताब्यात घेतले आहे.
इम्रान फिरोज मिर्झा उर्फ इराणी (वय २४), मुक्तार सय्यद नुराणी (वय १९) दोघेही रा. इराणीवस्ती लोणी काळभोर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या इराणी टोळीतील दोघांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
१९ जानेवारीला ज्योती चिंचवडे या दिराच्या दुचाकीवरून निघाल्या होत्या. शाहूनगर येथील बीआरटी बस थांब्याजवळ आल्यानंतर त्यांच्या मागावर असलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील साठ हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावली.

Web Title: Irani gang rattles sneezing