टेकावडे प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

By Admin | Updated: November 23, 2015 00:42 IST2015-11-23T00:42:21+5:302015-11-23T00:42:21+5:30

नगरसेवक अविनाश टेकावडे खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. टेकावडे खून प्रकरणात आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली.

The investigation team investigates the case | टेकावडे प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

टेकावडे प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

पिंपरी : नगरसेवक अविनाश टेकावडे खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. टेकावडे खून प्रकरणात आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील एका आरोपीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पिंपरी पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल आक्षेप नोंदविणाऱ्या याचिकेत याचिकाकर्त्याने सीआयडीमार्फत तपास व्हावा,अशी मागणी केली आहे. दरम्यान, गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्याचा निर्णय झाला आहे. असे गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे यांनी सांगितले. संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाचे मिलिंद गायकवाड हे तपास अधिकारी म्हणुन काम पहाणार आहेत.
टेकावडे यांच्या खुनाच्या कटात सामील असल्याच्या संशयावरून मंगळवारी, १७ नोव्हेंबरला चार आरोपींना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारी १८ नोव्हेंबरला त्यांना न्यायालयात हजर केले. या आरोपींमध्ये रमेश लक्ष्मण चव्हाण (वय ३५,रा.चिखली), बाबू ऊर्फ सूर्योदय शेखर शेट्टी (वय ३५,रा.चिंचवड), इंद्रास युवराज पाटील (वय ३८,रा.चिखली),आकाश अनिल पोटघन (वय २०,रा.मोहननगर) यांचा समावेश आहे. या आरोपीपैकी बाबू शेट्टी याच्या वतीने गुरुवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. सीआयडी अथवा अन्य स्वतंत्र एजन्सीकडे या प्रकरणाचा तपास सोपवावा, अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The investigation team investigates the case