पिंपरी-चिंचवड महापालिका राबविणार आंतरराष्ट्रीय ‘फेस्टिव्हल ऑफ द फ्युचर’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 05:46 PM2020-01-14T17:46:12+5:302020-01-14T17:52:02+5:30

शहरातील २० नावीन्यपूर्ण स्टार्टअपच्या उद्योजक व व्यावसायिकांचे प्रकल्प प्रदर्शन घेण्यात येणार...

International 'Festival of the Future' to be implemented by Pimpri-Chinchwad Municipal Corporation | पिंपरी-चिंचवड महापालिका राबविणार आंतरराष्ट्रीय ‘फेस्टिव्हल ऑफ द फ्युचर’

पिंपरी-चिंचवड महापालिका राबविणार आंतरराष्ट्रीय ‘फेस्टिव्हल ऑफ द फ्युचर’

Next
ठळक मुद्देस्मार्ट सिटी योजना : शहरातील नवउद्योजकांना मिळणार प्रोत्साहनमहापौर उषा ढोरे व आयुक्त हर्डीकर यांनी सोमवारी घेतली पत्रकार परिषद उद्योन्मुख व स्टार्टअपमधील उद्योगांना व्यासपीठ

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्मार्ट सिटीअंतर्गत शहर परिवर्तन कार्यालयामार्फत युवा उद्योजकांना प्रोत्साहन देणे व नवीन उद्योजक घडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय ‘फेस्टिव्हल ऑफ द फ्युचर’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या २८ व २९ फेब्रुवारी २०२० रोजी होणाऱ्या उपक्रमाअंतर्गत हॅकेथॉन, पीचफेस्ट, नवउद्योजकांनी निर्माण केलेल्या संकल्पनांचे प्रदर्शन व नामांकित व्यक्तींचे मार्गदर्शन होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. 
महापौर उषा ढोरे व आयुक्त हर्डीकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी हर्डीकर म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय ‘फेस्टिव्हल ऑफ द फ्युचर’ अंतर्गत शहरातील विविध समस्यांवर नागरिकांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचा समावेश करणे. उद्योन्मुख व स्टार्टअपमधील उद्योगांना व्यासपीठ मिळवून देणे. या महोत्सवाच्या माध्यमातून उद्योजकांना गुंतवणूकदार मिळवून देणे. नागरिकांमधून उद्योजक घडविण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल.  शहरातील २० नावीन्यपूर्ण स्टार्टअपच्या उद्योजक व व्यावसायिकांचे प्रकल्प प्रदर्शन घेण्यात येणार आहे. यातून नवउद्योजकांना प्रेरणा मिळेल. शहराच्या औद्योगिक विकासात भर पडेल, असे आयुक्तांनी सांगितले.
...........
शहराच्या विकासात भर पडेल : उषा ढोरे
शहरातील नवोदित, नावीन्यपूर्ण उद्योजकांना कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमात शहरातील एक हजार स्टार्टअप उद्योजक सहभागी होण्याची शक्यता आहे. शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील नावीन्यपूर्ण कंपन्यांना ग्राहक, गुंतवणूकदार, भागीदार मिळविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्र्ण ठरेल. नव्या उद्योजकांना चालना दिल्याने शहराचा विकासदर वाढेल. रोजगार देणाºया कंपन्या निर्माण होतील. भविष्यात फिरती अर्थव्यवस्था आणायची असेल तर, असा उपक्रम घेणे आवश्यक आहे, असे महापौर ढोरे यांनी सांगितले. 
......
नवउद्योजकांना व्यासपीठ : श्रावण हर्डीकर 
नागरिकांनी शहर परिसरातील अडचणींवर नावीन्यपूर्ण उपाय व कल्पना सुचवाव्यात यासाठी हॅकेथॉन घेण्यात येणार आहे. स्टार्टअपना यशस्वी होण्यासाठी, त्यांचा विस्तार व्हावा यासाठी गुंतवणूक, पीओसी, कॉर्पोरेट आणि सरकार यांच्यामार्फत पोचण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देणे. मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न आहे. व्यावसायिक शिक्षण आणि संबंधित माहिती देण्यासाठी देशातील व परदेशातील यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहे. यापुढे हा महोत्सव दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात राबविण्यात येणार आहे, असे श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. 
 

Web Title: International 'Festival of the Future' to be implemented by Pimpri-Chinchwad Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.