पदविकाधारक अभियंत्यांवर अन्याय?
By Admin | Updated: July 13, 2015 04:01 IST2015-07-13T04:01:57+5:302015-07-13T04:01:57+5:30
महापालिकेतील पदविकाधारक अभियंत्यांवर पदोन्नती प्रक्रियेत अन्याय होत आहे, अशी तक्रार काही अभियंत्यांनी केली आहे. याबाबत राज्य शासनाच्या

पदविकाधारक अभियंत्यांवर अन्याय?
पिंपरी : महापालिकेतील पदविकाधारक अभियंत्यांवर पदोन्नती प्रक्रियेत अन्याय होत आहे, अशी तक्रार काही अभियंत्यांनी केली आहे. याबाबत राज्य शासनाच्या निर्णयानुसार महापालिका प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
स्थापत्य आणि विद्युत विभागामध्ये असणाऱ्या अभियंत्यांपैकी दोनशे अभियंते पदविकाधारक आहेत. स्थापत्य अभियंता संवर्गाच्या उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता या पदासाठी पदोन्नतीचा विचार करताना पदवी आणि पदविकाधारक अशा दोन वेगवेगळ्या याद्या तयार केल्या जातात. त्यांच्या पदोन्नतीचे प्रमाण १:१ असे आहे. त्यामुळे पदविकाधारक अभियंत्यांवर अन्याय होत आहे. याबाबत पदविकाधारक अभियंत्यांनी नगरविकास सचिवांशी पत्रव्यवहार केला आहे. या विभागाने पालिकेकडे खुलासाही मागविला आहे. परंतु पालिकेचा खुलासा समर्थनीय नसल्याचे पत्र सरकारने पालिकेला दिले आहे. दोन वेगवेगळ्या याद्या तयार कराव्यात, असा आदेश दिला आहे. याबाबत राज्य सरकारच्या धोरणाचा अभ्यास करीत असून, त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आयुक्त राजीव जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)