शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिकनगरीमधील यंत्राची धडधड दोन दिवसात होणार सुरू ; ३३ टक्के कामगार उपस्थितीची सक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 18:37 IST

संचारबंदीमुळे औद्योगिकनगरी म्हणून लौकिक असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील यंत्राची धडधड थांबली होती.

ठळक मुद्देशहरात राहणाऱ्या कामगारांना त्यांच्या स्वतंत्र वाहतूक व्यवस्थेचा बंदोबस्त करूनच उद्योग सुरू औद्योगिकनगरीत सुमारे ११ हजार उद्योग आणि तीन लाखापेक्षा अधिक कामगार काम करतात

पिंपरी : कोरोनाच्या प्रादूभार्वामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले उद्योग व्यवसाय येत्या दोन दिवसात सुरू होणार आहेत. कंपन्यांमध्ये ३३ टक्के उपस्थिती ठेवून उद्योग दोन दिवसांत सुरू करता येतील, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांन नियमावली तयार करण्याचे काम सुरू केले आहे. ३३ टक्के उपस्थिती आणि कामगारांना स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करण्याची अट घालण्यात आली आहे.कोरोनाचा प्रादूर्भाव सुरूवातीला पुण्यात आणि त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये वाढू लागल्याने संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे औद्योगिकनगरी म्हणून लौकिक असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील यंत्राची धडधड थांबली होती.  कोरोनामुळे शहरातील लहान, मोठे, मध्यम असे जवळपास १०० टक्के उद्योग बंद आहेत. सुमारे ११ हजार उद्योग आणि तीन लाखापेक्षा अधिक कामगार काम करतात.लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात जिल्हयातील चाकण, तळेगाव, रांजणगाव या शहराभोवतालच्यया ग्रामीण भागातील उद्योगांना परवानगी मिळाली. त्या पाठोपाठ पिंपरी चिंचवडमधील उद्योग सुरू करावेत, अशी मागणी शहरातून करण्यात आली होती. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शासनाला प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार उद्यागमंत्री सुभाष देसाई यांनी याबाबत कार्यवाही केली.  राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज परवानगी दिली आहे. याबाबतचा आदेश महापालिकेला पाठविला आहे. ३३ टक्के उपस्थिती ठेवून काही अटींवर ही परवानगी दिली आहे. तसेच शहरात राहणाऱ्या कामगारांना त्यांच्या स्वतंत्र वाहतूक व्यवस्थेचा बंदोबस्त करूनच उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, चाकण, तळेगाव, हिंजवडी परिसरातील उद्योग सुरू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील कंपन्या सुरू व्हाव्यात, यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शासनास प्रस्तावही पाठविला होता. शासनाने याबाबत मार्गदर्शक सूचना पाठविल्या असून याबाबतचा आदेश तातडीने काढण्यात येईल. नियमावलीचे पालन करून उद्योग सुरू करता येणार आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbusinessव्यवसायMIDCएमआयडीसीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस