इंद्रायणीत बुडणा-या तिघांना वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 06:21 IST2017-09-01T06:20:58+5:302017-09-01T06:21:08+5:30
गौरी गणपतीचे सातव्या दिवशी देहू येथील इंद्रायणी नदी पात्रात विर्सजन केल्यानंतर पोहताना बुडणा-या तीन तरुणांचे प्राण येथील गजराज बोटिंग क्लबच्या कर्मचाºयांनी दोन वेगवेगळ्या घटनांत वाचविले

इंद्रायणीत बुडणा-या तिघांना वाचविले
देहूगाव : गौरी गणपतीचे सातव्या दिवशी देहू येथील इंद्रायणी नदी पात्रात विर्सजन केल्यानंतर पोहताना बुडणाºया तीन तरुणांचे प्राण येथील गजराज बोटिंग क्लबच्या कर्मचाºयांनी दोन वेगवेगळ्या घटनांत वाचविले. पहिली घटना गुरुवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. रोहित सुधाकर पाटील (वय १९) आणि सिद्धार्थ तुकाराम कुलकर्णी (वय २०, दोघे रा. यमुनानगर, प्राधिकरण, निगडी) अशी बुडताना वाचविलेल्या तरुणांची नावे आहेत.
गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास यमुनानगर येथील आठ-नऊ तरुणासह रोहित आणि सिद्धार्थ घाटावर आले होते. त्यांनी आरती करून गणपतीचे विर्सजन केले. विर्सजनावेळी लाकडी पाट पाण्यात वाहून जात होता. हे पाहून रोहित आणि सिद्धार्थ घाटावरून पळत जात नदी पात्रात उडी घेतली आणि पाण्यात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यास सुरुवात केली. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत असताना त्यांची दमछाक झाली. दोघेही बुडू लागले. बुडण्याच्या भीतीने त्यांनी ऐकमेकांना घट्ट मिठी मारली. हे तरुण बुडताना जवळच उभे असलेल्या अमृतानंद मठ शाळेतील विद्यार्थी, शिक्षक वर्ग, विर्सजनासाठी नदी घाटावर आलेले गणेश भक्त तसेच त्यांच्या मित्रांनी आरडा-ओरड सुरू केली.