आयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 03:23 AM2018-05-27T03:23:03+5:302018-05-27T03:23:03+5:30

कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करताहेत़ आर्थिक ओढाताणीमुळे नैराश्याच्या गर्तेतील अनेक जण जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतात.

increased suicide in IT Hub | आयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या

आयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या

googlenewsNext

- संजय माने
पिंपरी - कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करताहेत़ आर्थिक ओढाताणीमुळे नैराश्याच्या गर्तेतील अनेक जण जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतात. या उलट परिस्थिती असलेल्या आयटी क्षेत्रात काम करणारे सुखवस्तू कुटुंब, तसेच मुबलक पैसा हाती खेळत असल्याने भौतिक सुखांची रेलचेल आहे, अशा परिस्थितीतही अभियंते आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. वाढता ताणतणाव, आयटीतील नवीन आव्हाने व बदलत्या परिस्थितीशी सामना करण्याचे मनोबल नसल्याने आयटी अभियंत्यांच्या बाबतीत अशा घटना घडत असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले.
शिक्षण संपवून करिअर सुरू केल्यानंतर अवघ्या काही वर्षांतच आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. वयाची विशी ओलांडलेले आणि पस्तीशीच्या टप्प्यातील आयटी अभियंते आणि आयटी क्षेत्रात काम करणाºया तरुणीही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊन जगाचा कायमचा निरोप घेत आहेत. मूळ गाव सोलापूर. परंतु, करिअर घडविण्यासाठी पुण्यात आलेल्या पूजा नागनाथ वाघमारे या २३ वर्षे वयाच्या आयटी अभियंता तरुणीने मारुंजी येथील
सदनिकेत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी घडली़ त्यामुळे आयटी अभियंता तरुण, तरुणींच्या मानसिकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
वाकड येथील ºिहदम सोसायटीत राहणाºया ३५ वर्षे वयाच्या आनंद वासुदेव यादव या आयटी अभियंत्याने राहत्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. अशा काही घटना वर्षभरात वाकड, हिंजवडी आणि पिंपळे
गुरव परिसरात घडल्या आहेत.
ठाणे येथे वडील बांधकाम व्यावसायिक, कौटुंबिक-आर्थिक स्थिती चांगली. पत्नीने घटस्फोट घेतल्याने आनंदचे मानसिक संतुलन ढासळले. दरम्यान, ठाण्यातील एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. तिच्याकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या आनंदने आत्महत्येचा मार्ग निवडला.
आयुष्याची सुरुवात करण्याच्या टप्प्यावर आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेण्याचे प्रमाण आयटी अभियंत्यांमध्ये वाढू लागले आहे. आयटी अभियंत्याकडे भौतिक सुख व सोयी असल्यातरी मानसिक ताणतणाव व परिस्थितीला समोरे जाण्याचे मनोबल नसल्याने त्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचे समुपदेशकांचे मत आहे.

आत्महत्या करणारे आयटी अभियंता तरुण, तरुणी यांची आत्महत्येची कारणे जरी वेगवेगळीअसली तरी त्यांच्यात नैराश्य येण्याची काही कारणे सर्वसाधारणच आहेत. कमी वयात हातात खुळखुळणारा गरजेपेक्षा अधिक पैसा, कुटुंबापासून दूर राहत असल्याने वर्तणुकीत येणारा बेतालपणा, सहनशीलतेचा अभाव, नकार पचविण्याची नसेलेली क्षमता या प्रमुख कारणांमुळे आयटी अभियंते आत्महत्येच्या वाटेवर असल्याचे जाणवू लागले आहे. पालकांपासून दूर, त्यातच अचानक जीवनशैलीत होत गेलेला बदल, व्यसनाधीनता, चुकीच्या मार्गाने नेणाºया मित्र मंडळींची संगत यामुळे सर्व काही असूनही आयटी क्षेत्रात काम करणाºया अभियत्यांवर नैराश्याच्या गर्तेत जाण्याची वेळ येते. योग्य वेळी योग्य प्रकारचे मार्गदर्शन, समुपदेशन होत नसल्याने त्यांना टोकाच्या निर्णयापासून वाचविण्याची वेळ निघून गेलेली असते. या कारणांमुळे आयटी अभियंते आत्महत्येच्या वाटेवर आहेत, असा निष्कर्ष निघतो.
किशोर गुजर, मानसोपचार तज्ज्ञ

तीन महिन्यांत चार घटना
हिंजवडी येथील आयटी कंपनीत काम करणाºया अभिषेककुमार राजेशकुमार यादव (वय २३, रा. माण, मूळ बिहार) या अभियंत्याने राहत्या सदनिकेत पंख्याला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना याच परिसरात घडली. इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून उडी मारून जिशन नासीर शेख २७ वर्षे वयाच्या अभियंत्याने आत्महत्या केली. पिंपळे गुरव येथील या घटनेनंतर काही दिवसांतच मेकॅनिकल इंजिनिअर पदावर काम करणाºया निनाद देशभूषण पाटील या २४ वर्षे वयाच्या अभियंत्याने रहाटणीतील वर्धमान हाईटस या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शहरवासीयांच्या अद्याप विस्मृतीत गेलेली नाही. विदर्भातून आयटी कंपनीत नोकरी करण्यासाठी पुण्यात आलेल्या मीनल अशोक देशमुख या २८ वर्षाच्या तरुणीने विवाह काही दिवसांवर येऊन ठेपला असताना राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Web Title: increased suicide in IT Hub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.