शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

‘स्वाइन फ्लू’ची वाढली डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 03:36 IST

पाच दिवसांत दोघांचा मृत्यू, रुग्णांच्या संख्येत वाढ; नागरिकांत भीती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात एच १ एन १ या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. महापालिका कार्यक्षेत्रात गेल्या पाच दिवसांत तब्बल ११ रुग्ण आढळले आहेत. यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत.एच १ एन १ या आजाराने काळेवाडी येथील ४३ वर्षीय व्यक्तीचा सोमवारी मृत्यू झाला. या व्यक्तीला १४ आॅगस्टला उपचारासाठी थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. तर पाच दिवसांपुर्वीच लाजेवाडी येथील ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.१ जानेवारीपासून अद्यापपर्यंत ३ हजार ७७७ जणांना टॅमीफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये अद्यापपर्यंत एकूण २२ रुग्ण आढळले असून, तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मागील दहा ते पंधरा दिवसांपासून शहरात रुग्ण आढळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.एच१ एन१ चा संशयित रुग्ण आढळून आल्यास किंवा या आजारासारखे लक्षणे एखाद्या रुग्णामध्ये दिसून आल्यास अशा रुग्णांना तातडीने टॅमीफ्लूच्या गोळ्या सुरू कराव्यात. गरोदर माता व अतिजोखमीच्या रुग्णांना आयएलआय लक्षणे आढळून आल्यास तातडीने एच१ एन१ ची प्रतिबंधात्मक लस द्यावी.महापालिकेच्या रुग्णालयात, दवाखान्यात लसीकरण सत्र आयोजित करण्यात येत असून, त्यामध्ये उपस्थित नागरिकांना एच१ एन१ प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत माहिती दिली जाईल. खासगी रुग्णालयातील डॉक्टर यांच्या करिता एच१ एन१ या आजाराबाबत माहिती व प्रशिक्षण सत्र आयोजित करणेबाबत कळविले असून, एच१ एन१ बाधित संशयित रुग्णांसाठी विलीगीकरण कक्ष व आवश्यकतेनुसार आयसीयू विभाग उपलब्धतेनुसार तयार ठेवण्याबाबत सूचित केले आहे. या आजाराकरिता आवश्यक टॅमीफ्लू / लस याची कमतरता होणार नाही याची दक्षता घेणेबाबत कळविले आहे. वायसीएम रुग्णालयात एच१ एन१ संशयित किंवा बाधित रुग्ण दाखलझाल्यास प्राधान्याने तशा रुग्णांकरिता आयसोलेशन वॉर्ड उपलब्ध करून देणे तसेच बाधित रुग्णांना आयसीयू विभागामध्ये खाटा प्राधान्याने देण्यात याव्यात, आदी सूचना देण्यात आल्या आहेत.नागरिकांसाठी खबरदारीचे उपायसर्दी, खोकला असलेल्या व्यक्तीने लक्षणे नाहीशी होईपर्यंत घरातून बाहेर पडू नये. जनसंपर्क टाळावा.खोकताना, शिंकताना नाकातोंडावर रुमाल धरावा.डॉक्टरांनी दिलेल्या औषधांशिवाय गरम पाण्यात मीठ, हळद, टाकून गुळण्या करणे. गरम पाण्याची वाफ घेणे असे घरगुती उपायही करावेत. घरातील टेबल, संगणकाचा की बोर्ड यांसारखे पृष्ठभाग वारंवार स्वच्छ करावेत.वारंवार हात साबणाने व स्वच्छ पाण्याने धुवावेत. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी शारीरिक, मानसिक ताण टाळावा, पुरेशी विश्रांती घ्यावी. आरोग्यदायी आहार घ्यावा. आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यांसारख्या सी व ई-व्हिटॅमिन असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.रुग्णालय प्रमुखांना सूचनाया आजाराला आळा घालण्यासाठी रुग्णालय प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी आपल्या अखत्यारित असलेल्या कर्मचाºयांना एच १ एन १ आजाराविषयी माहिती देऊन प्रशिक्षण आयोजित करावे. शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, गणपती मंडळ, महिला बचत गट व सार्वजनिक ठिकाणी जनजागृती कार्यक्रम राबवावा.सर्दी, खोकला असलेल्या व्यक्तीने लक्षणे नाहीशी होईपर्यंत घरातून बाहेर पडू नये. जनसंपर्क टाळावा. खोकताना, शिंकताना नाकातोंडावर रुमाल धरावा. आरोग्यदायी आहार घ्यावा. लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्य