उबदार लोकरीच्या वस्त्रांना वाढली मागणी

By Admin | Updated: November 15, 2015 00:56 IST2015-11-15T00:56:04+5:302015-11-15T00:56:04+5:30

थंडीची चाहूल लागताच बाजारात उबदार लोकरीच्या वस्त्रांना मागणी वाढली आहे. पिंपरी कॅ म्प तसेच शहर परिसरात दुकाने उबदार वस्त्रांच्या गर्दीने फुलली आहेत.

Increased demand for warm woolen garments | उबदार लोकरीच्या वस्त्रांना वाढली मागणी

उबदार लोकरीच्या वस्त्रांना वाढली मागणी

पिंपरी : थंडीची चाहूल लागताच बाजारात उबदार लोकरीच्या वस्त्रांना मागणी वाढली आहे. पिंपरी कॅ म्प तसेच शहर परिसरात दुकाने उबदार वस्त्रांच्या गर्दीने फुलली आहेत. लहान मुलांसाठी तसेच तरुणवर्गासाठी उबदार वस्त्रांचे नवे ट्रेंड बाजारात आले आहेत.
तरुण वर्गासाठी स्वेट्स शर्ट्स, कॉटन जॅकेट्स, टोप्यांचे जॅकेट्स, कॉटन कोट, हातमोजे, सॉक्स, किड्स हुडीज, स्वेटर, जॅकेट, श्रग अशा विविध व्हरायटीज बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. लहान मुलांसाठी कानटोपी, डिझाइनचे पायमोजे, हातमोजे आकर्षक ठरत आहेत. थंडीच्या कपड्यांमध्येही नवनवीन फॅशन बाजारात आली आहे. विविध गळ्यांच्या फॅ शन, चैनच्या जॅकेट्सला जास्त मागणी आहे. याकरिता बाजारात डिस्काउंटही सुरू झाले आहेत.
लहान मुलांच्या उबदार लोकरीच्या कपड्यांनी बाजारात गर्दी झाली आहे. एका जोडीवर एक जोडी फ्री अशी सवलत सुरू आहे. २५० रुपयांपासून ते ८०० रुपयांपर्यंत लहान मुलांच्या कपड्यांच्या किमती आहेत. थंडीसाठी नवनवीन रजई तसेच ब्लँकेट्सही बाजारात उपलब्ध झाले आहेत. दारावरच उबदार वस्त्रे विक्रीसाठी उपलब्ध झाल्यामुळे नागरिक घरीच खरेदी करणे पसंत करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Increased demand for warm woolen garments