शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 19:45 IST

रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र येथून प्रतिदिन १०० दशलक्ष लिटर अतिरिक्त जलउपसा करण्यात येणार सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची पाणी उचलण्याची आणि शुद्धीकरण करण्याची स्थापित क्षमता ४२८ एमएलडी इतकी

ठळक मुद्देसर्वसाधारण सभेची पन्नास कोटी खर्चास मंजुरीपिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा पाणी वाहून नेण्याची क्षमता लक्षात घेता प्रतिदिनी ४८० एमएलडी पाणी उपलब्धसध्या महापालिकेची पाणी उचलण्याची आणि शुद्धीकरण करण्याची स्थापित क्षमता ४२८ एमएलडी

पिंपरी : पवना धरण शंभर टक्के भरले असतानाही पाणी आरक्षण आणि पाणी उचलण्याची क्षमता कमी असल्याने महापालिकेस पाणी घेता येत नाही. त्यामुळे रावेत पंपगृहातील पंपिंग मशिनरीची क्षमता वाढविण्याबरोबरच सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात येणार आहे. या विषयीच्या पन्नास कोटी रुपये खर्चास सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी धरणात एकूण १८५.६७ दशलक्ष घनमीटर पाणी उपसा आरक्षण मंजूर आहे. धरणातून नदीत पाणी सोडले जाते आणि रावेत येथील पात्रातून पाणी उचलण्यात येते. पाणी वाहून नेण्याची क्षमता लक्षात घेता प्रतिदिनी ४८० एमएलडी पाणी उपलब्ध होते. सद्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची पाणी उचलण्याची आणि शुद्धीकरण करण्याची स्थापित क्षमता ४२८ एमएलडी इतकी आहे. जलउपसा केंद्रातून प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया करून जलवाहिनीद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविले जाते.त्यातही ओव्हर लोडींग करून ४८० एमएलडी इतके पाणी उचलले जाते. सन २०१९ मध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र, मर्यादित क्षमतेमुळे महापालिकेला पाणी उचलता आले नाही. त्यामुळे  पाणी उचलणे आणि शुद्धीकरण क्षमतेमध्ये वाढ केल्यास, ज्यावर्षी जादा पाऊस होईल, त्यावर्षी जास्त पाणी उचलणे शक्य होणार आहे. त्यामुळे रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र येथून प्रतिदिन १०० दशलक्ष लिटर अतिरिक्त जलउपसा करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनीही नदीची साठवण, क्षमता आणि प्रक्रिया यंत्रणा वाढविण्याच्या विषयास तरतूद उपलब्ध करून दिली होती. तसेच पाणीपुरवठा विभागाला तातडीने कामे करण्याचे आदेशही दिले होते.

जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविणाररावेत येथील पंपिंग मशिनरी व जलशुद्धीकरण केंद्र यांची क्षमता वाढविण्याची कामे तातडीने करणे आवश्यक आहे. या कामाचा समावेश महापालिकेच्या सन २०१९-२० च्या अंदाजपत्रकात नसल्यामुळे अंदाजपत्रकातील विशेष योजना या लेखाशिषार्खाली रावेत येथील पंपिंग मशिनरी व सेक्टर क्रमांक २३ मधील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविणे, या कामाचा नव्याने समावेश करण्यात आला. त्यानंतर या कामासाठी आवश्यक पन्नास कोटी रुपयांच्या खचार्चा विषय महापालिका सर्वसाधारण सभेसमोर ऐनवेळी दाखल करण्यात आला होता. त्यावर चर्चा होऊन या विषयास मंजुरी देण्यात आली आहे.

टॅग्स :ravetरावेतWaterपाणी