मिळकतकर बिल, नोटीस मिळणार एका क्लिकवर
By Admin | Updated: September 25, 2015 01:05 IST2015-09-25T01:05:21+5:302015-09-25T01:05:21+5:30
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सात प्रभागांतील सर्व ९०१३ मिळकतकराची चालू आर्थिक वर्षातील (२०१५-१६) बिले, तसेच मागील थकबाकीदारांना पाठविण्यात येणारी नोटीस बोर्डाच्या

मिळकतकर बिल, नोटीस मिळणार एका क्लिकवर
किवळे : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सात प्रभागांतील सर्व ९०१३ मिळकतकराची चालू आर्थिक वर्षातील (२०१५-१६) बिले, तसेच मागील थकबाकीदारांना पाठविण्यात येणारी नोटीस बोर्डाच्या संकेतस्थळावर बुधवारपासून उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांना घरबसल्या एका क्लिकवर कर व थकबाकीच्या रकमेची माहिती मिळणार आहे. सोमवारपासून मिळकतकर बिले घरपोच वाटप सुरू करण्यात आले आहे.
अनेकदा मिळकत कराची बिले वेळेवर मिळत नसल्या कारणाने बिले भरण्यास नागरिक टाळाटाळ करीत असतात. काम धंद्यानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्यांना बिले मिळण्यात अडचणी येत असतात. काही कॅन्टोन्मेंट बोर्ड, तसेच शेजारच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत यापूर्वीच मिळकतकराची व पाणीपट्टी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याने इंटरनेटच्या जमान्यात नागरिकांच्या दृष्टीने खूपच सोईचे झाले आहे. त्यामुळे बोर्ड प्रशासनाने संकेतस्थळावर मिळकतकराची बिले उपलब्ध करण्याबाबत गेल्या दोन
वर्षांत ‘लोकमत’ने बातम्या प्रसिद्ध करून पाठपुरावा केला होता. चिंचोली येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भेगडे, बाळासाहेब जाधव यांनी संकेतस्थळावर सर्व प्रकारची बिले उपलब्ध करण्याबाबत मागणी लावून धरली होती.
बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळावर ँ३३स्र://६६६.ूुीिँ४१ङ्मं.िङ्म१ॅ गेल्यावर पहिल्या पानावर डाऊनलोड सदरात क्लिक केल्यावर मिळकतकर बिले २०१५-१६ हे शीर्षक दिसते. आंबेडकरनगर, भेगडेवाडी, चिंचोली, दत्तनगर, ईबीपी रोड, गांधीनगर, गार्डन सिटी, घोरवडी इंदिरानगर, किन्हई, कोटेश्वरवाडी, एम. बी. कॅम्प, मेन बाजार माळवाडी, मामुर्डी, परमार कॉम्प्लेक्स, पारशी चाळ, स्वामी विवेकानंद रोड, शेलारवाडी, शितळानगर, शिवाजीनगर, सिद्धिविनायकनगरी, सर्व्हे क्रमांक ४४१, ४४७ व झेंडेमळा असे भाग असून यातील आपणास हव्या असणाऱ्या भागाच्या नावावर क्लिक केल्यावर त्या भागातील सर्व मिळकतकर बिले समोर दिसतात. तसेच त्याखाली त्या भागातील मिळकतकराची थकबाकी सूचना (नोटीस) दिसत असून, त्यात विविध करांची थकबाकी, नोटीस शुल्क, व्याज आदी माहिती दिसत आहे.(वार्ताहर )