शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीई’साठी उत्पन्नाचा दाखला बंधनकारक, प्रवेश अर्जातच भरावा लागणार क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 03:31 IST

शिक्षण हक्क कायद्यांर्तगत २५ टक्के आरक्षित जागांसाठी राबविल्या जाणाºया आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी कोणतेही कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही. मात्र, उत्पन्नाच्या दाखल्यावरील बारकोड खाली नमूद क्रमांक आॅनलाईन अर्जामध्ये भरणे करणे आवश्यक आहे.त्यामुळे पालकांना प्रवेश अर्ज भरण्यापूर्वीच उत्पन्नाचा दाखला काढून ठेवावा लागणार आहे.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांर्तगत २५ टक्के आरक्षित जागांसाठी राबविल्या जाणाºया आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी कोणतेही कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही. मात्र, उत्पन्नाच्या दाखल्यावरील बारकोड खाली नमूद क्रमांक आॅनलाईन अर्जामध्ये भरणे करणे आवश्यक आहे.त्यामुळे पालकांना प्रवेश अर्ज भरण्यापूर्वीच उत्पन्नाचा दाखला काढून ठेवावा लागणार आहे.राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने राबविली जात आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्क परताव्याची रक्कम दिली जात नसल्याने अनेक शाळांनी आॅनलाईन नोंदणी केली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने स्वत:च २०१५-१६ या शैक्षणिक वर्षाच्या माहितीच्या आधारे काही शाळांची नोंदणी करून घेतली. त्यातही ज्या शाळांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, अशा शाळांना येत्या ३० जानेवारीपर्यंत नोंदणी करण्यास मुदत दिली आहे. राज्यात आरटीई प्रवेशास १४ हजार ५७५ शाळा पात्र आहेत. त्यातील ५३३ शाळांनी अद्यापनोंदणी केली नाही. यात पुणे जिल्ह्यातील ६१ शाळांचा समावेश आहे. सर्व शाळांची नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर पुढील काही दिवसात आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. आरटीई प्रवेशासाठी एस.सी. व एस.टी संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाची अट नाही.मात्र,आर्थिक मागास संवर्गातील आरटीई प्रवेशासाठी एक लाख उत्पन्नाची अट आहे.आरटीई प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया बेकायदेशीरराज्याच्या शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत तयारी केली जात असली तरी शाळांना न विचारता शिक्षण विभागाने बेकायदेशीरपणे आरटीई प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया केली आहे, असा आरोप इंडिपेंडेन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनचे (आयईएमएसए) पदाधिकारी राजेंद्र सिंग यांनी केला आहे.तसेच शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्क परताव्याची रक्कमदिली जात नाही. तोपर्यंत शाळांकडून प्रवेश दिले जाणार नाहीत,असे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे याबाबललवकरच पत्रकार परिषद घेवून शाळांची भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकPuneपुणे