शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ध्वनिप्रदूषणात वाढ : कर्णकर्कश हॉर्नचे डेसिबल मोजण्याचे मशिन नसल्यामुळे कारवाईकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 01:25 IST

शहरातील बाईकवेड्या तरुणांकडून चमकोगिरीसाठी विचित्र आवाज काढणाऱ्या हॉर्नचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होत आहे.

- शीतल मुंडेपिंपरी - शहरातील बाईकवेड्या तरुणांकडून चमकोगिरीसाठी विचित्र आवाज काढणाऱ्या हॉर्नचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होत आहे. मात्र, हॉर्नच्या आवाजाचे डेसिबल मोजण्याची मशिन वाहतूक पोलिसांकडे उपलब्ध नसल्याने कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा गैरफायदा टवाळखोर तरुण घेत असून, शहरातील शाळा, महाविद्यालय व मार्केट परिसरात कर्णकर्कश आवाजाचा गोंगाट सुरू आहे.चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी कंपनीकडून आवश्यक क्षमतेचे साधारण ८० डेसिबलपेक्षा कमी आवाजाचे हॉर्न बसविण्यात येतात. मात्र, त्यामध्ये काही बदल करून अथवा वेगळे आवाज करणारे जादा डेसिबलचे हॉर्न बसविण्यात येतात. या वेळी वाहतूक नियम थाब्यावर बसविले जातात. या विचित्र व मोठ्या आवाजाने आजुबाजूला चालणारे नागरिक घाबरतात. मात्र, वाहतूक पोलीस संंबंधितावर कारवाई करताना दिसत नाहीत. त्याविषयी अधिक माहिती घेतली असता आवाज डेसिबलमध्ये मोजण्यासाठी मशिनची आवश्यकता असतो.पिंपरी-चिंचवड वाहतूक परिवहन विभागाकडे या विषयी चौकशी केली. या वेळी आरटीओकडे डेसिबल मोजण्याचे मशिन उपलब्धनसल्याने कारवाई करता येत नसल्याची गंभीर माहिती उजेडात आली आहे. सध्या बाजारातफॅन्सी व चायनीज हॉर्न ५०० ते ६०० रुपयांना सहजपणे मिळत आहेत. स्वस्त व जास्त आवाज करणारेम्हणून चायनीज हॉर्नला मागणीवाढत आहे. पिंपरीतील आॅटोमोबाईल दुकाने वा गॅरेजमधून असे हॉर्न बसवून दिले जातात.प्राण्यांचे विचित्र आवाज...१विविध प्राण्यांचे विचित्र आवाज, मुलाच्या रडण्याचा आवाज, सायरनचा आवाज, म्युझिकल असे विविध प्रकारचे हॉर्न दुचाकीला बसवले जातात. विशेषत: बुलेटला बंदुकीच्या गोळ्यांसारखे आवाज सोडणारे, कानठळ्या बसणारे हॉर्न बसवून घेतले जातात. चित्र-विचित्र आवाजाच्या हॉर्नमुळे पादचारी दचकतात. काही युवक रस्त्यावरून जाताना मुद्दाम व घाबरविण्यासाठी अचानक हॉर्न वाजवितात. त्यामुळे शेजारील वाहनधारकही दचकतो. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांना या प्रकाराचा त्रास होत असून, अपघात होण्याचाही धोका आहे.२शाळा व महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करण्यासाठी विचित्र हॉर्न वाजवले जातात. याचा त्रास शाळा-महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना होतो. दवाखान्यांच्या परिसरातदेखील अशा कर्णकर्कश हॉर्नचा आवाज कमी होताना काही दिसत नाहीत. दवाखान्यातील रुग्णांना अशा हॉर्नचा त्रास होत असतो. तरीदेखील त्या परिसरात असे हॉर्न वाजवण्याचे प्रमाण अधिकच आहे.गाडी चालवताना हॉर्न वाजवलाच नाही पाहिजे. ध्वनिप्रदूषणाचे परिणाम अतिशय गंभीर आहेत. कोणत्याही व्यक्तीने गाडी चालवताना हॉर्न न वाजवता गाडी चालवणे आवश्यक आहे. कारण त्याचा परिणाम लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्यावर होतो. कोणत्याही कंपनीच्या मोटारीतील हॉर्नचे डेसिबल ८० पेक्षा अधिक नाही. त्यामुळे तरुणांनी ८० डेसिबलपेक्षा अधिक आवाजाचे हॉर्न बसवून नागरिकांना त्रास होणारे कोणतेही कृत्य करू नये. - आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारीबºयाच वेळा तरुण मुले रस्त्याच्या बाजूने जाणारे पादचारी यांच्याजवळ येऊन हॉर्न जोरात वाजवतात. महिला, मुली रस्त्याने जात असतील, तर टवाळखोर मुले जवळ येऊन मोठ्या आवाजातील हॉर्न वाजवतात. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करण्याची आवश्यकता आहे.- निहारिका उके, महिला वाहनचालक

टॅग्स :pollutionप्रदूषण