शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस असल्याची तोतयागिरी, भामट्याला केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 01:02 IST

पोलीस असल्याची बतावणी करून हॉटेलात फुकट खायचे, पथारीवाल्यांना दमदाटी करून हप्ते मागायचे, पान टपरीवाल्यांना धमकावून मिळेल ती रक्कम घ्यायची... कोणी विचारलेच, तर गुन्हे शाखेचा पोलीस अधिकारी आहे

पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करून हॉटेलात फुकट खायचे, पथारीवाल्यांना दमदाटी करून हप्ते मागायचे, पान टपरीवाल्यांना धमकावून मिळेल ती रक्कम घ्यायची... कोणी विचारलेच, तर गुन्हे शाखेचा पोलीस अधिकारी आहे; पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यावर कळेल, मी कोण आहे ते... असे दरडावत पोलिसाच्या आविर्भावात वावरणाऱ्या भामट्याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बुधवारी भोसरी येथून जेरबंद केले. चाकण पोलिसांकडे त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची कुंडली मिळाली असून, राजेंद्र मोहन पाटेकर (रा. भोसरी) असे या तोतया पोलीस अधिकाºयाचे नाव आहे.पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करीत चाकण परिसरात हॉटेल व्यावसायिक, पान टपरीचालक, पथारीवाले आणि किराणा दुकानदार यांच्याकडून एकजण पैसे उकळत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे हवालदार दीपक खरात, पोलीस शिपाई गणेश सावंत, प्रवीण पाटील, विशाल भोईर यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांना याबाबतची माहिती देण्यात आली. आरोपीचे छायाचित्रही प्राप्त झाले होते. २६ डिसेंबर २०१८ला बुधवारी तो भोसरीत अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे व पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता, त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे.पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, हवालदार दीपक खरात, प्रमोद लांडे, सचिन उगले, गणेश सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.संत तुकारामनगर, भोसरी येथील पाण्याच्या टाकीजवळ राहण्यास असलेल्या राजेंद्र मोहन पाटेकर या आरोपीचे वय ५५ आहे. पोलिसांना साजेसे व्यक्तिमत्त्व असलेल्या या आरोपीवर चाकण पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे