शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यातील 'मातृछाया' कोविड रुग्णालय तात्काळ बंद करा; बेजबाबदारपणामुळे रुग्णाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 00:17 IST

मृत्यू झालेल्या रुग्णाला हाताळल्यानंतर हे पीपीई किट तिथेच सुरक्षा भिंतीलगत उघड्यावर जाळण्यात आले.. हा सर्व प्रकार सोशल मीडियावर देखील व्हायरल

लोणावळा : लोणावळ्यात नव्यानेच सुरू झालेले मातृछाया कोविड रुग्णालय तात्काळ बंद करा अशी मागणी मुख्याधिकारी रवी पवार यांनी मावळचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.     लोणावळा शहरात नव्याने मातृछाया हाॅटेलमध्ये कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. हे रुग्णालय सुरू झाल्याची कोणालाच कल्पना नाही. काल या ठिकाणी एका तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. त्यांची आँक्सिजन पातळी ४० पर्यत खाली आली असताना व रुग्णालयात कसलीही सुविधा उपलब्ध नसताना त्याला याठिकाणी दाखल करून घेण्यात आले व त्याचा दुदैवाने मृत्यू झाला. ही घटना समजल्यानंतर मुख्याधिकारी रवी पवार यांनी या रुग्णालयाला भेट दिली असता, त्याठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते. रुग्णालयात पुरेशी सामुग्री उपलब्ध नाही, कर्मचारी नाही, व्हेंटिलेटरची सुविधा नाही केवळ बायपप मशिन ठेवण्यात आली आहे. त्याठिकाणी हाऊस किपिंगची एक व्यक्ती उपस्थित होती.

 लोणावळा नगरपरिषद शून्य मृत्यूदराच्या दिशेने वाटचाल करत असताना व त्याकरिता वेगवेगळी अभियाने राबवली जात असताना इतके बेजबाबदारपणे रुग्णालय चालविणे बरोबर नाही असे या पत्रात म्हटले आहे. तसेच याठिकाणी मृत्यू झालेल्या रुग्णाला हाताळल्यानंतर पीपीई किट हे तेथेच सुरक्षा भिंतीलगत उघड्यावर जाळण्यात आले. स्थानिकांनी याबाबत तक्रारी केल्या. तसेच हा सर्व प्रकार सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. 

लोणावळा नगरपरिषदेला हे कोविड सेंटर सुरू झाल्याबाबत कोणतीच कल्पना देखील नव्हती. प्रांत अधिकारी यांची परवानगी घेत हे सेंटर सुरू करण्यात आले असून जनरल बेडकरिता येथे चार हजार रुपये दिवसाचे आकारले जातात ते शासकीय दरानुसार असले तरी सुविधा मात्र नसल्याने एका रुग्णांचा नाहक जीव गेला आहे. या सर्व प्रकरणाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतर वरील सर्व प्रकार समोर आला असल्याने सदर सेंटरची मान्यता तात्काळ रद्द करा अशी मागणी मुख्याधिकारी रवी पवार यांनी केली आहे. कोविडच्या नावाखाली रुग्णांच्या जीवाशी हा खेळ सुरू असल्याने तात्काळ हे सेंटर बंद करून दोषींवर कारवाई करा अशी माग'णी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी केली आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल