मनसेचे अनंत कोऱ्हाळे यांनी उभारले बेकायदा कार्यालय
By Admin | Updated: September 12, 2015 04:10 IST2015-09-12T04:10:19+5:302015-09-12T04:10:19+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापालिकेतील गटनेते अनंत कोऱ्हाळे यांनी वृक्षतोड करून बेकायदापणे कार्यालय सुरू केले आहे. त्यावर कारवाई व्हावी, नगरसेवकपद रद्द करावे,

मनसेचे अनंत कोऱ्हाळे यांनी उभारले बेकायदा कार्यालय
पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापालिकेतील गटनेते अनंत कोऱ्हाळे यांनी वृक्षतोड करून बेकायदापणे कार्यालय सुरू केले आहे. त्यावर कारवाई व्हावी, नगरसेवकपद रद्द करावे, फौजदारी दाखल करावी, अशी मागणी तानाजीनगर, चिंचवड परिसरातील सुजाण नागरिकांनी केली आहे. मोकळ्या जागेत लिंबाचे मोठे झाड तोडून त्या जागेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान नगरसेवक आणि महापालिकेतील गटनेते यांनी कंटेनरस्वरूपाची मोठी टपरी
ठेवून कार्यालय सुरू केले आहे.
(प्रतिनिधी)