शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्यात हिंमत असेल तर शहीद हेमंत करकरे यांना भारतरत्न द्या : उमर खालिद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 15:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजपवाले वाघ म्हणतात. आम्हाला वाघाची नव्हे तर माणसाची गरज आहे..

ठळक मुद्दे पिंपरी येथे भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

पिंपरी : भाजपवाले म्हणातात, सावरकरांना भारतरत्न देणार, तुमच्यात हिम्मत असेल तर शहीद हेमंत करकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्या, असे आव्हान जेएनयूचे माजी विद्यार्थी उमर खालिद यांनी केंद्र सरकारला दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजपवाले वाघ म्हणतात. आम्हाला वाघाची नव्हे तर माणसाची गरज आहे. ते वाघ असतील तर त्यांची जागा प्राणीसंग्रहालयात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी-चिंचवड संविधान बचाव समितीच्या वतीने नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि एनपीआर या कायद्याच्या विरोधात निषेध आयोजित करण्यात आली होती. या वेळी खालिद बोलत होते. मानव कांबळे, मारुती भापकर, अखिल मुजावर, प्रताप गुरव, सुरेश बेरी, माधव आव्हाड आदी या वेळी उपस्थित होते. खालिद म्हणाले, ह्यह्यसीएए, एनआरसी आणि एनपीआर या कायद्यांविरोधात आम्ही देशभर शांततेत आंदोलन करणार आहोत. भाजपच ेसरकार असलेल्या राज्यांमध्ये या आंदालनात पोलिसांकडून लाठी चार्ज करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मात्र पोलिसांकडून सहकार्य मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शांततेत आंदोलन सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांना सलाम. शहीद हेमंत करकरे यांचा आम्ही सन्मान करतो. मोदीजी तुम्ही सन्मान करीत असलेल्या पोलिसांमध्ये हेमंत करकरे यांचा समावेश आहे का?, भाजपाच्या प्रज्ञासिंग ठाकूर यांनी हेमंत करकरे यांना अपमानित केले. सत्ता आणि पैसा हा या लोकांचा एकमेव उद्देश आहे. त्यातूनच हे म्हणतात, आम्ही सावरकर यांना भारतरत्न देणार. तुमच्यात हिंमत असेल तर शहीद हेमंत करकरे यांना भारतरत्न द्या.देशातील गरिबी, शेतकऱ्यांचे प्रश्न, विकासाचा मुद्दा यावरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी देशात हिंसा पसरविली जात आहे. संसदेतील बहुमताचा भाजपाला अहंकार आहे. मात्र जनता रस्त्यावर उतरून बहुमत सिद्ध करेल.मै शेर नही हूँ इन्सान हूँ  और इन्सान सोचता समझता है, गुजरात का शेर ना सोचता है ना समझता है, अशी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून खालिद म्हणाला, आता सांगितलं जातंय कागदपत्रं दाखवा. आम्ही कागदपत्रं दाखवणार नाही. कोणत्याही अधिकाऱ्याला घरात येऊ देणार नाही,क्यूँ की हिंदुस्थानके साथ कागज का नहीं दिल का रिश्ता है.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडUmar Khalidउमर खालिदNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा