पाणी न मिळाल्यास कालवा फोडणार

By Admin | Updated: August 18, 2014 23:21 IST2014-08-18T23:21:39+5:302014-08-18T23:21:39+5:30

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्टय़ात पावसाने ओढ दिली आहे. तसेच, 42, 43 व 46 वितरिकेस सुमारे तीन महिन्यांपासून पाणी सोडलेले नाही.

If you do not get water, then break the canal | पाणी न मिळाल्यास कालवा फोडणार

पाणी न मिळाल्यास कालवा फोडणार

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्टय़ात पावसाने ओढ दिली आहे. तसेच, 42, 43 व 46 वितरिकेस सुमारे तीन महिन्यांपासून पाणी सोडलेले नाही. त्यामुळे परिसरातील शेतामधील पिके धोक्यात आली आहेत. पेरणी व उसाच्या लागवडीही खोळंबल्या आहेत. त्यामुळे कालवा फोडून पाणी घेण्याचा इशारा शेतक:यांनी दिला आहे.
अक्षरश शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्याच्याच डोळ्यांतून पाऊस पडण्याची वेळ आल्याने या पट्टय़ातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या संतप्त शेतक:यांनी पाटबंधारे खात्याकडे वारंवार मागणी करूनही ‘टेल टू हेड्’या न्यायाने पाणी सोडण्याचे आश्वासन त्यांना दिले जाते. त्याप्रमाणो ‘टेल हेड’ संभाळीतमध्ये असणा:या 42, 43 व 46 या वितरिकेस पाणी सोडले जात नाही. त्यामुळे या शेतक:यांची शेतपिके धोक्यात आली आहेत. शेतकरीवर्ग संतप्त झाला आहे.  
येथील शेतकरी एक आठवडय़ाची मुदत देत मंगळवार्पयत पाणी सोडण्याची वाट पाहणार आहे. पाणी न सोडल्यास या वितरिकेचे सर्व लाभार्थी शेतकरी ‘नीरा डावा कालवा’ फोडून पाणी घेणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिल्याची माहिती गणोश फडतरे यांनी दिली आहे. निवेदनात म्हटले आहे की, 42 ते 46 वितरिकेवरील शेतकरी बारामाही पाण्याचे लाभार्थी असताना मे महिन्यात यांना पाणी सोडले होते. पण त्या वेळीही काही शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले होते. नीरा डाव्या कालव्याला गेले. 15 दिवसांपासून पाणी आले आहे. मात्र, येथील वितरिकेस मागणी करून देखील पाणी सोडले नाही, त्यामुळे उभी पिके जळून चालली आहेत.
निवेदनाच्या प्रती सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या सर्व कार्यालयांस, तहसीलदार, पोलीस स्टेशन यांना दिल्या आहेत. या निवेदनावर गणोश फडतरे, वसंत पवार, विठ्ठल मुळीक, सर्जेराव काळे, विजय कळसाईत, केशव जामदार, अण्णा सूर्यवंशी, चंद्रकांत निंबाळकर, सूर्यकांत खरात, अॅड. हेमंत नरूटे, अनिल पवार, बाबासाहेब वाघमोडे, विजय निंबाळकर यांच्यासह 42, 43 व 46 वरील लाभार्थी शेतक:यांच्या स्वाक्ष:या आहेत. (वार्ताहर)
 
शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठीही कमालीची प्रतीक्षा 
वालचंदनगर रणगाव रत्नपुरी जंक्शन नऊदारे शिरसटवाडी या भागातील शेतपिके धोक्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठीही कमालीची प्रतीक्षा करावी लागत आहे. एकंदरीत पाटपाण्याचा प्रश्न खूपच गंभीर झाला आहे. पाटबंधारे विभागास बारामाही पाणीपट्टी भरणा:या शेतक:यांवर हा घोर अन्याय झाल्याने तो संतप्त झाला आहे. तरी या 42, 43 व 46 वितरिकेस मंगळवार्पयत 19 ऑगस्ट 2क्14 र्पयत पाणी सोडावे अन्यथा नीरा डावा कालवा फोडून पाणी घेणार असल्याचा इशारा पाटबंधारे विभागास दिला आहे. 

 

Web Title: If you do not get water, then break the canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.