मन स्थिर ठेवल्यास औषधांची गरज नाही - विलास जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 20:15 IST2018-04-12T20:15:43+5:302018-04-12T20:15:43+5:30

८० टक्के समस्या मनातून येतात, तर मानसिक विचारातून आजार उत्पन्न होतात, त्यासाठी आपले मन स्थिर ठेवावे म्हणजे तुम्हाला औषधांची गरज लागणार नाही.

If the mind remains steady, medicines are not needed - Vilas Jain | मन स्थिर ठेवल्यास औषधांची गरज नाही - विलास जैन

मन स्थिर ठेवल्यास औषधांची गरज नाही - विलास जैन

हनुमंत देवकर 
चाकण : “८० टक्के समस्या मनातून येतात, तर मानसिक विचारातून आजार उत्पन्न होतात, त्यासाठी आपले मन स्थिर ठेवावे म्हणजे तुम्हाला औषधांची गरज लागणार नाही. ध्यानामुळे ताण, चिंता, नैराश्य आणि वेदना कमी करण्यास मदत होते”, असे प्रतिपादन व्याख्याते विलास जैन यांनी केले. चाकण रोटरी क्लब आयोजित शेठ धनराजजी सांकला स्मृती व्याख्यानमालेत “ध्यान साधना, सक्षम जीवनशैली का राज” या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले,“आपल्या मुलांची इतर मुलांशी कधीही तुलना करू नका, म्हणजे तुमचा ताण कमी होईल. ध्यान हा आयुष्य जगण्याचा मार्ग आहे, ध्यान हे आपल्या रोजच्या जीवनशैलीचा एक भाग झाला पाहिजे, म्हणजे तो जीवनाचा एक मार्ग होईल, त्यामुळे मनाची स्थिरता निर्माण होईल. मन स्थिर नसेल तर चिडचिड होते व भावनिक स्थिरता नसेल तर ८० टक्के समस्या तेथून सुरु होतात, म्हणून आपले ध्यान, मन स्थिर ठेवावे.”

यावेळी प्रमुख पाहुणे व व्याख्याते विलास जैन,
रोटरी क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सातव, सचिव अतुल वाव्हळ, व्याख्यानमाला समितीचे चेअरमन सुहास गोरे, माजी अध्यक्ष नितीन पाटील, मोतीलाल सांकला यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व्याख्यनमालेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उद्योजक नितीन पाटील, अध्यक्ष माऊली सातव व नगरसेवक प्रकाश भुजबळ यांच्या हस्ते चाकण येथील दिव्यांग मुलगा कल्पेश भुजबळ यास तीनचाकी सायकल प्रदान करण्यात आली.

यावेळी भगवान घोडेकर, विनय भुजबळ, दीपक करपे, महेश कांडगे, डॉ. शिवाजी एंडाईत, रमेश बोथरा, संभाजी सोनवणे, सुनील शहा, प्रवीण मुथा, प्रसाद हुलावळे, सुशीला सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: If the mind remains steady, medicines are not needed - Vilas Jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.