शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

जाहिरात फलकांचा निगडीत झाडांना विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 3:38 AM

पर्यावरणरक्षणासाठी झाडांचे अतिशय महत्त्व असताना जाहिरातबाजांना त्याचा विसर पडला आहे.

निगडी : पर्यावरणरक्षणासाठी झाडांचे अतिशय महत्त्व असताना जाहिरातबाजांना त्याचा विसर पडला आहे. चौक, बसथांबे, इमारती आदी ठिकाणी जाहिरात ही नित्याचीच बाब असली, तरी झाडांवर खिळे ठोकून अनेक जण जाहिराती करीत असल्याचे आकुर्डी, निगडी, प्राधिकरण, यमुनानगर आदी भागात वास्तव समोर आले आहे.झाडांवरील जाहिरातींमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये असंतोष उसळला आहे. शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये आदी भागात सुशोभीकरण आणि शीतल छाया मिळावी, यासाठी झाडे लावण्यात आली आहेत. काही झाडे पुरातन असल्याने त्यांचा आवाकाही मोठा झाला आहे. मात्र या मोठ्या वृक्षांचा काही महाभागांनी जाहिरातीसाठी वापर केला आहे. काही शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालयात झाडांवर कायमस्वरुपी जाहिराती झळकत असल्याचे चित्र आहे. जाहिरातफलक लावण्यासाठी झाडांना खिळे ठोकून ते लावण्यात आले आहे.परिसरातील छोट्या-मोठ्या हॉटेलसमोरील झाडांवर व जाहिरात फलकांवर रोषणाईदेखील केली जाते. महापालिका अधिकाऱ्यांना, कर्मचाºयांना झाडांवर जाहिराती दिसत असताना कारवाई का केली जात नाही, याबाबत पर्यावरणप्रेमी शंका व्यक्त करीत आहेत. एकीकडे शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘वनसंपदेचे संवर्धन करा’ अशा घोषणा देत पर्यावरण सुरक्षेचे धडे देते. मात्र दुसरीकडे झाडांचा जाहिरातीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.राज्यात १३ टक्के कमी वनाच्छादनभौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वन आच्छादन असणे आवश्यक आहे. परंतु राज्यात एकूण २० टक्के वनाच्छादन असल्याची आकडेवारी आहे. त्यामुळे तापमानात वाढ, वातावरणात बदल, बदललेले नैसर्गिक ऋतुचक्र, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वाढता दुष्काळ अशा गंभीर समस्यांच्या सामोरे जावे लागत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्यात राबविला.फलकांसाठी झाडांची छाटणीपरिश्रम, मेहनतीने वाढविण्यात आलेल्या वृक्षावर खिळे ठोकून जाहिरातफलक लावण्यात येते. फ्लेक्स लावण्यात अडथळा निर्माण झाल्यास प्रसंगी झाडाच्या फांद्याही छाटल्या जातात. त्यामुळे पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. महापालिकेने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. रस्त्यालगत झाडांवर खिळे मारून जाहिरात करणाºयांवर कायदेशीर कारवाई करण्यात, यावी अशी मागणी होत आहे.काही झाडांवर खिळे ठोकता येत नाहीत. तरीदेखील शहरात राजरोसपणे झाडांवर खिळे ठोकून जाहिरातींचे फलक लावले जातात. ही बाब नियमबाह्य आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने संबंधितांवर कडक कारवाई करावी.- दयानंद गौडगाव,पर्यावरणप्रेमी, निगडी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड