शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

स्वप्नातील घरकुलासाठी तुडुंब गर्दी, ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस २०१७’मध्ये शेकडो गृहप्रकल्पांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 4:39 AM

एकाच छताखाली पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील प्रॉपर्टीचे पर्याय नागरिकांना उपलब्ध व्हावेत, यासाठी ‘लोकमत’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस २०१७’ या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांची तुडुंब गर्दी झाली होती. स्वप्नातील घराचे बुकिंग केले.

पिंपरी : एकाच छताखाली पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील प्रॉपर्टीचे पर्याय नागरिकांना उपलब्ध व्हावेत, यासाठी ‘लोकमत’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस २०१७’ या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांची तुडुंब गर्दी झाली होती. स्वप्नातील घराचे बुकिंग केले.नोटाबंदी झाली. महारेरा, जीएसटी आली अशा कालखंडात सदनिका की भूखंड घ्यायचा, सदनिका घ्यायची असेल तर परवडेल अशा किमतीत कोठे मिळू शकेल, मनात निर्माण होणाºया शंका, प्रश्न यांची उत्तरे लोकमतच्या गृहप्रदर्शनात ग्राहकांना मिळाली. शहराच्या मध्यवर्ती व परिसरात बांधकाम व्यावसायिकांनी उभारलेल्या गृहप्रकल्पांची, वित्तसंस्था, बँकांची माहिती उपलब्ध होईल, अशी दालने या प्रदर्शनात आहेत. शेकडो गृहप्रकल्प या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. सुटीचा दिवस असल्याने सकाळी दहा वाजल्यापासूनच दिवसभर लोकांची ये-जा सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाºया पावसाने उघडीप दिली आहे. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्राहक आले होते. अनेकांनी हक्काचे घर शोधून पसंतीचा पहिलाच फ्लॅट आरक्षित केला.शहरातील गृहप्रकल्पांसह शहराबाहेर गुंतवणूक म्हणून शिरगाव, उर्से, कामशेत, हिंजवडी, मारुंजी व मावळातील भूखंड घेण्याची इच्छा व्यक्त केली. नव्याने उद्योजक होऊ इच्छिणाºयांसाठी तळेगाव आणि चाकण या औद्योगिक ठिकाणी भूखंड उपलब्ध आहेत. स्वत:चे घर साकारण्यासाठी एक, दोन, तीन गुंठ्यांचे भूखंड अल्पदरात उपलब्ध आहेत. त्याच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे आऊटडोअर पार्टनर धिरेंद्र अ‍ॅडव्हर्टायझिंग, ब्रेव्हरेट पार्टनर साई प्रसन्ना ग्रुप आहे.गुंतवणुकीचे अनेक पर्याय एकाच छताखालीगृहप्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. मोशी, चºहोली, डुडुळगाव, आळंदी, चाकण, वाकड, पिंपळे सौदागर, चिंचवड, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कान्हे फाटा या भागांत लोकांनी बुकिंगला पसंती दिली. प्रदर्शनाला हजारो लोकांनी भेट दिली. गुंतवणुकीचे अनेक पर्याय लोकांना एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने लोकांनी लोकमतचे आभार मानले. तर, मंदीच्या काळातही या प्रदर्शनास उदंड प्रतिसाद मिळाल्याने बांधकाम व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले.आजचे कार्यक्रमआनंदी वास्तू : प्रसिद्ध वास्तूतज्ज्ञ आनंद पिंपळकर यांचे सकाळी ११.३० वा. ‘सकारातत्मक जीवनशैली आणि आनंदी वास्तू’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.अंकशास्त्राचे महत्त्व : प्रसिद्ध अंकशास्त्रतज्ज्ञ श्वेता जुमानी यांचे दुपारी ३.३० वा. ‘सर्वसामान्यांना असामान्य बनविणारे अंकशास्त्र’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.लोकमतच्या वतीने आयोजित केलेल्या गृहप्रदर्शनातून शहरातील नागरिकांना स्वप्नातील घर आरक्षित करण्याची संधी उपलब्ध करून दिली. हा उपक्रम स्तुत्य आहे. - धीरेंद्र सेंगर,धिरेंद्र अ‍ॅडव्हरटायझिंग