शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका यंत्रणा अपयशी; माणुसकी जिवंत : मरणासन्न "ती"च्या मदतीला धावले कार्यकर्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 17:09 IST

संपुर्ण कुटुंबातील व्यक्तींचे वेगवेगळ्या कारणाने निधन झाल्याने ती अस्वस्थ होऊन घरीच पडून राहिली...      

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच तिच्याशी असलेला संपर्क केला बंद तिची परिस्थिती पाहून परिसरातील डॉक्टरांनी तिला दाखल करून घेण्यासाठी दर्शविली असमर्थता

पराग कुंकुलोळ- पिंपरी : रुग्णालयाचे दरवाजे झिजविल्यानंतर 'ती'च्यावर योग्य इलाज होईना व कोणी भरती सुद्धा करून घेईना. त्यामुळे आठ दिवस अंधाऱ्या खोलीत ती निराधार मरणासन्न अवस्थेत यातना भोगत होती. अखेर या अनाथ मुलीच्या मदतीला परिसरातील कार्यकर्ते धावले. कार्यकर्त्यांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेशी अनेकदा संपर्क केला. तरीही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर स्थानिक नगरसेवकांनी खासगी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.चिंचवड मधील भोईरनगर येथे ही ३२ वर्षीय मुलगी अशक्तपणा व खोकला येत असल्याने काही दिवसांपासून घरात यातना भोगत होती. घराच्या बाजूला असणाऱ्या सार्वजनिक शौचालयातून येणारी दुर्गंधी आणि भयावह वाटणाऱ्या तिच्या घरात ती धापा टाकत होती.ती रुग्णालयात उपचारासाठी जाऊन आली.मात्र तात्पुरती तपासणी करून तिला घरी पाठविण्यात आले.दिवसेंदिवस तिची प्रकृती खालावत गेली. शेजारचे काहीजण अनाथ असल्याने तिला जेवण देऊन विचारपूस करत होते.मात्र दिवसेंदिवस तिच्या वेदना वाढत राहिल्या.संपुर्ण कुटुंबातील व्यक्तींचे वेगवेगळ्या कारणाने निधन झाल्याने ती अस्वस्थ होऊन घरीच पडून राहिली.       कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच तिच्याशी असलेला संपर्क बंद केला. तिला गरज होती ती उपचारांची. मात्र तिची परिस्थिती पाहून परिसरातील डॉक्टरांनी तिला दाखल करून घेण्यासाठी असमर्थता दर्शविली.या मुलीचे आई-वडील आणि भाऊ यांचे निधन झाले आहे.मोठया बहिणीचे लग्न झाल्याने ती सासरी मुंबईत असते.काही दिवस ती एका मेडिकल दुकानात कामाला जात होती.मात्र त्रास होत असल्याने तिने जाणे बंद केले.घरात एकटीच रहात असल्याने तिच्या अडचणी वाढत गेल्या.ही बाब स्थानिक कार्यकर्त्यांना समजली.त्यांनी त्वरित मदतीसाठी 'लोकमत' प्रतिनिधीशी संपर्क साधला.तिला उपचाराची आवश्यकता असल्याने रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला.मात्र त्यांच्या कडून प्रश्नांची सरबत्ती सोडून कोणताही सुविधा उपलब्ध झाली नाही.वारंवार संपर्क करूनही अडीचतास रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही.---नगरसेवकाच्या मदतीने रुग्णवाहिका...अखेर स्थानिक नगरसेवक शीतल शिंदे यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. नगरसेविका माधुरी कुलकर्णी यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क करून उपचार व्यवस्थेसाठी सहकार्य केले. स्थानिक कार्यकर्ते अमित जाधव, सचिन सकोरे,विशाल रुकारी हे सर्वजण मदतीसाठी धावून आले. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते रवी शेट्टी व लखन भंडारे हे रुग्णवाहिकेसह तिला घेऊन रुग्णालयात गेले.रात्री उशिरापर्यंत तपासणी झाल्यावर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसंगावधान पाहून कार्यकर्ते मदतीला धावल्याने समाजात अजूनही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल