शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कुदळवाडीची कारवाई कशी केली? खासदार अमोल कोल्हे यांनी आयुक्तांकडे मागितला अहवाल

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: March 4, 2025 20:00 IST

या कारवाईमुळे भंगार गोदांमांसह इतर अनेक उद्योजक अडचणीत

पिंपरी : चिखली आणि कुदळवाडी भागातील अनधिकृत बांधकामांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठी कारवाई केली. यावरून कारवाईची प्रक्रिया, करवसुली, तसेच कारवाईमुळे उद्ध्वस्त झालेल्या पाचशे लघुउद्योगांचे पुढे काय केले, असे प्रश्न उपस्थित करीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागितला आहे.महापालिकेने कुदळवाडीत धडक कारवाई करत सात दिवसांत ८२५ एकर जागेवरील अनधिकृत भंगार गुदामे, लघुउद्योग व इतर आस्थापना भुईसपाट केल्या. या कारवाईमुळे भंगार गोदांमांसह इतर अनेक उद्योजक अडचणीत आले. रोजगार हिरावल्याने अनेकजण रस्त्यावर आले. महापालिकेच्या या कारवाईवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लघुउद्योजक व उद्योजकांच्या संघटनांनी या कारवाईवरून महापालिका व सरकारच्या धोरणावर टीका केली. आता खासदार कोल्हे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून सविस्तर अहवालाची मागणी केली आहे.त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेने चिखली आणि कुदळवाडी परिसरात २०२५ पर्यंत किती लोकांकडून कर गोळा केला? बांधकामे अनधिकृत होती, तर त्यांच्याकडून कर का वसूल केला? ग्रामपंचायतीपासून वास्तव्य व व्यवसाय असलेल्या लोकांकडे सातबारा, फेरफार व इतर कागदपत्रे होती का? ग्रामपंचायतीतून महापालिकेत आलेल्या आणि कर गोळा केलेल्या बांधकामांना अनधिकृत का घोषित केले? या भागात अनधिकृत बांधकामांवर यापूर्वी किती वेळा व कोणती कारवाई केली? त्यांना कितीवेळा नोटिसा दिल्या गेल्या? कर संकलन करताना संबंधित आस्थापनांना पूर्वसूचना दिली होती का, या प्रश्नांच्या आधारे माहिती उपलब्ध करून द्यावी. माहिती देण्यास दुर्लक्ष केले जात असून पुन्हा दुर्लक्ष केल्यास संसदेत हा मुद्दा मांडू

कारवाईनंतर टीपी स्कीम राबविण्याची चर्चा

चिखली, कुदळवाडीत झालेल्या कारवाई महापालिका प्रशासनाच्या चुकीमुळे या भागात पाचशेवर लघुउद्योग उद्ध्वस्त झाले असतील, तर त्यांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे का, या भागात नवीन टीपी स्कीम प्रस्तावित असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबतही सविस्तर खुलासा करावा, असे कोल्हे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे