शहरं
Join us  
Trending Stories
1
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
2
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
3
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले- "आता पर्याय...'
4
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
5
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
6
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
7
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
8
रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध होती...
9
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
10
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...
11
प्रेमासाठी बदललं जेंडर, पती निघाला फ्रॉड, पैसे-प्रॉपर्टीचा होता लालची, ट्रांसजेंडर अभिनेत्रीचा खुलासा
12
कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश
13
विरोधकांनी शेतकरी प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, चर्चा करण्यास केव्हाही तयार: अजित पवार
14
चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण
15
आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र
16
विक्री घटली! जूनमध्ये टाटा, मारुती, ह्युंदाईच्या गोटात हाहाकार उडाला; महिंद्रा, एमजीने झेंडा रोवला...
17
पुढील शंभर वर्षांचा विचार करून नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करा; DCM अजित पवारांचे निर्देश
18
धक्कादायक! गर्लफ्रेंडने भेटायला बोलवलं अन् बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्टच कापला; कशावरून झाला वाद?
19
तरुण-तरुणी तर्राट, स्कॉर्पियो सुसाट, रस्ता सोडून थेट घरात घुसली गाडी
20
लिस्ट होताच गुंतवणूकदारांकडून शेअरची विक्री; पहिल्याच दिवशी केलं मोठं नुकसान, ₹६९ वर आली किंमत

रोजचा खर्च भागवायचा कसा?

By admin | Updated: December 22, 2016 02:05 IST

नोटाबंदी करून ४२ दिवस उलटून गेले, तरी बँका व एटीएमसमोरील नागरिकांच्या रांगा कमी झालेल्या नाहीत. भोसरी औद्योगिक

भोसरी : नोटाबंदी करून ४२ दिवस उलटून गेले, तरी बँका व एटीएमसमोरील नागरिकांच्या रांगा कमी झालेल्या नाहीत. भोसरी औद्योगिक भागात हजारो कामगार देशाच्या कानाकोपऱ्यातून येऊन उदरनिर्वाहासाठी दिवसरात्र काबाडकष्ट करीत असतो. पगार मिळतो, पण बँकेत जमा झालेला पगार कित्येक दिवस हातात पडत नाही. आठवड्यातून सुटीचा पूर्ण दिवसही रांगेत जातो व फक्त २००० रुपये हातात मिळतात. या रकमेतून खोलीभाडे देणेही अशक्य आहे. त्यामुळे रोजचे इतर खर्च कसे भागवावेत, असा प्रश्न चाकरमान्यांसमोर आ वासून उभा राहिला आहे. दर महिन्याच्या ७ ते १० तारखेच्या दरम्यान एमआयडीसीतील कंपन्यांत मासिक पगार होतात. ८ नोव्हेंबरला नोटबंदीचा झाल्यानंतर कारखानदारांनी कामगारांना जुन्याच नोटा पगारात दिल्या. त्या नोटा बाजारात चालत नसल्याने नाईलाजाने त्या बँकेत भरण्यासाठी दिवस-दिवस बँकांच्या रांगेसमोर नोटा भरण्यासाठी थांबावे लागते. कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे. नोटाबंदीनंतर दुसरा पगार हातात घेतानाही बऱ्याच कामगारांना जुन्याच ५०० व १०००च्या नोटा देण्याचा काही कारखानदारांनी प्रयत्न केला. बहुतांश परप्रांतीय कामगारांचे बँकांमध्ये खाते नसल्याने त्यांना जुन्या नोटांचे करायचे काय, असा प्रश्न पडला असून, चलनबंदीच्या निर्णयाचा मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. भोसरी परिसरात ठिकठिकाणी नाक्यावर थांबून मोलमजुरीची कामे करणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे. असे कामगार बहुतांश असंघटित क्षेत्रातील आहेत. या कामगारांना काम मिळणे बंद झाले आहे. एखाद-दुसरे काम मिळाले, तरी जुन्या नोटा स्वीकाराव्या लागत आहेत. हातावर पोट असलेले हे कामगार सकाळी मेहनत करतात आणि सायंकाळी खातात. हातात आलेली जुनी नोट अर्ध्या किमतीत विकून रेशन खरेदी करण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे कामगार सांगतात. बरेचसे परप्रांतीय कामगार कुटुंबाला महिन्याकाठी काही पैसे पाठवत असतात. (वार्ताहर)