आणखी किती बळींची प्रतीक्षा?

By Admin | Updated: July 20, 2015 04:06 IST2015-07-20T04:06:28+5:302015-07-20T04:06:28+5:30

पावसाळ्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दरड कोसळण्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. रविवारी दुपारी दोन मोटारींवर दरड कोसळून दोन जण

How many more wait? | आणखी किती बळींची प्रतीक्षा?

आणखी किती बळींची प्रतीक्षा?

विशाल विकारी , लोणावळा
पावसाळ्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दरड कोसळण्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. रविवारी दुपारी दोन मोटारींवर दरड कोसळून दोन जण ठार झाले आहेत. या घटनेनंतर महामार्ग सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महामार्गाची देखभाल करणारी खासगी कंपनी, रस्ते विकास महामंडळ आणि राज्य शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासनाच्या असंवेदनशून्य कारभारामुळे आणखी किती निरपराध लोकाचे जीव जाणार, असा खरा प्रश्न आहे.
जाळीतून दगड आले खाली
आडोशी बोगद्याकडे जाणाऱ्या मार्गावरील डोंगराला काही भागात दगड जाळीत पडले आहेत, तर काही ठिकाणांना अद्याप जाळ्या
लावलेल्या नाहीत़ रविवारी दुपारी जिथे दरड कोसळली, तिथे धोकादायक ठिकाणास सुरक्षा जाळी होती. मात्र, ही जाळी तोडून दरड पडली. जाळ्या कुचकामी झाल्या आहेत. या संदर्भात ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे पुन्हा दुर्घटना घडली.
तब्बल ३३ तास तीनही लेन बंद
२२ जूनला सकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने द्रुतगती महामार्गाच्या मुंबईकडे जाणाऱ्या तीनही लेन तब्बल ३३ तास बंद होत्या़ पाऊस सुरू झाला आहे. पुन्हा या भागात जोरदार पावसात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे़
जाळ्या धोकादायक
खंडाळा ते खोपोली दरम्यानच्या डोंगर भागाला सुरक्षा रोप लावले आहेत. मात्र ते आता मोठ्या प्रमाणात गंजले आहेत. काही ठिकाणी डोंगराला लावलेले बोल्ट सैल झाले आहेत़, तर अनेक दगड या रोपमध्ये आले आहेत. खंडाळा बोगद्याच्या तोंडाजवळ ज्या ठिकाणी २२ जूनला दरड कोसळली होती, तिच्याच शेजारी पुन्हा काही दगड खाली आले आहेत़ सुरक्षा कठडे आणि जाळ्या धोकादायक आहेत.
शेकडोंनी गमावला जीव
महामार्गावर कामशेतजवळील काही भाग व खंडाळा ते खोपोली दरम्यानचा संपूर्ण परिसर हा डोंगराळ भाग आहे़ मोठे डोंगर फ ोडून महामार्गाची निर्मिती चौदा वर्षांपूर्वी केली. २००५, २००८, २०११ व २०१३ मध्ये घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. त्यात शेकडो निरपराधांचे जीव गेले आहेत. त्याशिवाय वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागला आहे.

Web Title: How many more wait?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.