शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये अडकले कुशल कामगार मग उद्योग सुरू कसे होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 21:37 IST

राज्य शासनाने ग्रामीण भागातील काही अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग व कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे..

ठळक मुद्देपरवानगीनंतरही औद्योगिकचक्र बंदच :  शासनाच्या अटी-शर्थीची पूर्तता करणे जिकरीचे

हणमंत पाटील- पिंपरी चिंचवड : शासनाने उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी काही अटी- शर्थी घातल्या आहेत. त्यांची पूर्तता करणे उद्योजकाना जिकरीचे ठरत आहे. शिवाय पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊन असल्याने कुशल कामगार व व्यवस्थापक यांना चाकण, म्हाळुंगे, शिक्रापूर व रांजणगाव परिसरातील उद्योगापर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यामुळे शासनाच्या परवानगी नंतरही पुणे औद्योगिक क्षेत्रातील कारखाने सोमवारी सुरू होऊ शकले नाहीत. राज्य शासनाने ग्रामीण भागातील काही अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग व कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक अटी- शर्ती घातल्या आहेत. त्याची पूर्तता करण्याबरोबर एमआयडीसीच्या अधिकाऱ्याकडून ऑनलाइन परवानगी व तशी माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावी लागणार आहे. संबंधित कंपनीला कामगारांची ने-आण करणे, तेथेच निवास व भोजनाची व्यवस्था करावी लागणार आहे. शिवाय कामगारांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी कंपनीवर राहणार आहे. कामावर असणारा एखादा कामगार पॉझिटिव्ह आढळला, तर मालकावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. या सर्व अटीमुळे कंपनी मालक व उद्योजक काम सुरू करण्यास धजावत नाहीत.मात्र, पुणे व पिंपरी चिंचवड महानगर हे रेडझोनमध्ये असल्याने येथे लॉकडाउन कडक करण्यात आला आहे. पुणे परिसरातील चाकण, म्हाळुंगे, तळेगाव, शिक्रापूर व रांजणगाव येथील औद्योगिक क्षेत्रात काम  करणारा बहुतेक कुशल कामगार व व्यवस्थापक वर्ग या दोन्ही शहरात अडकला आहे. शिवाय इतर जिल्ह्यातील मोठया प्रमाणात कामगार वर्ग गावी गेला आहे. त्यामुळे थोडया मनुष्यबळावर काम करणे अडचणीचे होत आहे. पुणे व मुंबई लॉकडाउन असल्याने कच्या मालाची वाहतूक करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.  त्यामुळे अत्यावश्यक सेवा म्हणून उद्योग सुरू करण्यास परवानगी मिळाली, तरी आणखी काही दिवस कारखाने सुरु होण्यास लागणार आहेत. -----कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने उद्योग व कंपन्या सुरू करण्यासाठी अनेक कडक अटी व शर्ती घातल्या आहेत. त्यांच्या जागेवर शासनाची भूमिका योग्य आहे. ग्रामीण भागात अनेक उद्योग व कंपनी असल्यातरी त्याचा कुशल कामगार वर्ग, मॅनेजर व मालकही पुणे व पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहे. दोन्ही महानगरे लॉकडाऊन आहेत. शिवाय उद्योजकांना कामगारांची सर्व व्यवस्था करणे व जोखीम घेणे पेलवणारे नाही. त्यामुळे उद्योग सुरू होण्यास आणखी थोडा वेळ लागेल. - संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटना.---दिवसभरात कोणत्याही कंपनीचे चालक व मालक परवानगी अथवा माहिती देण्यासाठी पोलीस स्टेशनला आले नाहीत. शासनाने परवानगी दिल्यास कंपन्याना पूर्ण सहकार्य करण्यात येईल. - कल्याण पवार, पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस स्टेशन.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMIDCएमआयडीसीbusinessव्यवसायEmployeeकर्मचारीGovernmentसरकारshravan hardikarश्रावण हर्डिकरNavalkishor Ramनवलकिशोर राम