चौथ्या मजल्यावरून पडून घरमालक ठार
By Admin | Updated: April 24, 2017 04:53 IST2017-04-24T04:53:21+5:302017-04-24T04:53:21+5:30
चिखली, पाटीलनगर येथे घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी चौथ्या मजल्यावरून पडून घरमालकाचा मृत्यू झाला. ही घटना

चौथ्या मजल्यावरून पडून घरमालक ठार
पिंपरी : चिखली, पाटीलनगर येथे घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी चौथ्या मजल्यावरून पडून घरमालकाचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. विजय ज्ञानोबा मोरे (वय ४९) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पाटीलनगर येथे मोरे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ते गेले. चौथ्या मजल्यावर बांधकाम साहित्याचा राडारोडा होता. त्यातून वाट काढताना तोल जाऊन ते घसरून खाली पडले. सुमारे ५० फूट उंचीवरून ते खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने संभाजीनगर येथील खासगी रूग्णालयात
नेण्यात आले. (प्रतिनिधी)