अण्णासाहेब पाटील यांना आदरांजली
By Admin | Updated: March 24, 2017 04:04 IST2017-03-24T04:04:45+5:302017-03-24T04:04:45+5:30
अखंड भारताच्या कामगार चळवळीत सर्वांत बलाढ्य समजल्या जाणाऱ्या पहिल्या माथाडी कामगार संघटनेचे जन्मदाते आणि माथाडी

अण्णासाहेब पाटील यांना आदरांजली
भोसरी : अखंड भारताच्या कामगार चळवळीत सर्वांत बलाढ्य समजल्या जाणाऱ्या पहिल्या माथाडी कामगार संघटनेचे जन्मदाते आणि माथाडी कामगारच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबाचेही आराध्यदैवत म्हणजे (कै.) आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिका व महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी चिंचवड येथील केएसबी चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद म्हणाले की, अण्णासाहेब पाटील यांनी समाजात उभा केलेला कामगार संघटनारूपी वटवृक्ष माथाडींना सदैव एकसंघ राहण्याच्या मूलमंत्राची सावली देत राहणार आहे. त्यांच्या पितृतुल्य छायेत महाराष्ट्र मजदूर संघटना एकसंघपणे दाही दिशांना फोफावत आहे.
या वेळी महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, इरफान सय्यद, नगरसेवक तुषार हिंगे, केशव घोळवे, परेश मोरे, प्रवीण जाधव, पोपटराव धोंडे, बाळासाहेब देसाई, अंकुश लांडे, मुरली कदम, खंडू गवळी, पांडुरंग कदम, सर्जेराव कचरे उपस्थित होते. (वार्ताहर)