पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिवंगत महापौर मधुकर पवळे यांच्या जयंतीनिमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.या वेळी उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, माजी महापौर संजोग वाघेरे, नगरसदस्या सुमन पवळे, शर्मिला बाबर, कमल घोलप, चंदा लोखंडे, अश्विनी बोबडे, नगरसदस्य तुषार कामठे, नामदेव ढाके, बाबासाहेब त्रिभुवन, सहायकआयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, मनोज लोणकर आदी उपस्थित होते.दरम्यान, दिवंगत महापौर मधुकर पवळे पुतळा परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यातआले.या वेळी मनोगत व्यक्त करताना पवळे यांच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेण्यात आला.
मधुकर पवळे यांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:17 IST