हिंजवडीत पोलिसाला धक्काबुक्की

By Admin | Updated: March 25, 2016 03:40 IST2016-03-25T03:40:46+5:302016-03-25T03:40:46+5:30

रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले हॉटेल बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला हॉटेल मालकाने धक्काबुक्की केल्याची घटना मंगळवारी (दि. २२) रात्री हिंजवडी येथे घडली.

Hinjewadi policeman shocked | हिंजवडीत पोलिसाला धक्काबुक्की

हिंजवडीत पोलिसाला धक्काबुक्की

हिंजवडी : रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले हॉटेल बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला हॉटेल मालकाने धक्काबुक्की केल्याची घटना मंगळवारी (दि. २२) रात्री हिंजवडी येथे घडली. या प्रकरणी हॉटेल मालक राहुल गोपाळ नायर (वय ४५, रा. ब्युरीच सोसायटी, हिंजवडी) याला अटक केली.
हिंजवडी ठाण्याचे पोलीस हवालदार धनराज किरणाळे हे मंगळवारी रात्री हिंजवडी परिसरात इतर कर्मचाऱ्यांसोबत गस्त घालीत होते. त्या वेळी नायर याचे हिंजवडीतील असलेले हॉटेल रात्री पावणेएकच्या सुमारास सुरू होते. हॉटेल बंद करण्यासाठी हवालदार धनराज किरणाळे हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत हॉटेल मालकाला सांगण्यासाठी गेले असताना हॉटेलमालक नायरने किरणाळे यांना धक्काबुक्की केली. (वार्ताहर)

Web Title: Hinjewadi policeman shocked