शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
2
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
3
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
4
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
5
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
6
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
7
फळं खावीत की ज्यूस प्यावा... आरोग्यासाठी काय फायदेशीर? डाएटीशियनने दूर केलं कन्फ्यूजन
8
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
9
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
10
"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा
11
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
12
"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
13
आयपीएलदरम्यान बीसीसीआयने मुंबई टी२० लीग संघाच्या मालकावर घातली आजीवन बंदी, कारण काय?
14
पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी
15
बार्शीत एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तूल जप्त,आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी; तुळजापूर कनेक्शन?
16
प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक तरीही कमाई कमीच! 'केसरी २'चा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर
17
Video - भलताच छंद! 'ती' डास मारते, जपून ठेवते अन् त्याला खास नाव देते; ठेवलाय अजब रेकॉर्ड
18
First ATM: केवळ ११,२०० लोकसंख्येचा असा देश, जिथे एकही ATM नव्हतं; आता सुरु झालं पहिलं एटीएम
19
तिसऱ्या मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी कोरियाचा हातभार, कुठे असेल तिसरी मुंबई?
20
IPL- एक ‘डॉट बॉल’ पडला, की लागतील ५०० झाडे!

प्रेयसीचा खून करून मृतदेह टाकला खंबाटकी घाटात; वाकड येथील घटना

By नारायण बडगुजर | Updated: November 27, 2024 20:53 IST

पोलिसांनी १२ तासांत गुन्ह्याची उकल करून या प्रकरणी प्रियकराला याला अटक केली

पिंपरी : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेने सतत पैशांची मागणी केल्याने तसेच चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने तिचा खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये खंबाटकी घाटात मृतदेह फेकून दिला. वाकड येथे सोमवारी (दि. २५) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.दिनेश पोपट ठोंबरे (३२, रा. बहुर, पो. करुंज, ता. मावळ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. जयश्री विनय मोरे (२७, रा. मारुंजी, हिंजवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर जयश्री पतीसोबत राहत नव्हती. तर, हिंजवडी येथील एका कंपनीत सुपरवायजर असलेला दिनेश याचे पहिले लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. दिनेश हा सोशल मीडियावर विविध पोस्ट करायचा. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी दिनेश आणि जयश्री यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून जयश्री आणि दिनेश हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांना तीन वर्षांचा मुलगा आहे. जयश्री आणि दिनेश यांचे काही दिवसांपासून पटत नव्हते. जयश्री नेहमी दिनेशकडे पैशांची मागणी करत होती. वेगळे राहायचे म्हणत होती. रविवारी (दि. २४) ते दोघेही भूमकर चौक येथे गाडीत असताना दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दिनेशने गाडीत हातोडीने जयश्रीच्या डोक्यात घाव घातले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयश्रीचा मृत्यू झाला.मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दिनेश हा सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत खंबाटकी घाटात गाडी घेऊन गेला. तेथे घाटात जयश्रीचा मृतदेह फेकला. त्यानंतर दिनेश पिंपरी- चिंचवडमध्ये परतला. सोमवारी (दि. २५) त्याने जयश्री बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलिस ठाण्यात दिली.दरम्यान, जयश्रीचे वर्णन असलेल्या महिलेचा मृतदेह मिळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासाची चक्रे फिरवली असता यामागे दिनेश असल्याचे पोलिसांच्या समोर आले. दिनेश याने तीन वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिले. पोलिसांनी याबाबतची पोस्ट देखील व्हायरल केली होती. तांत्रिक विश्लेषण करून वाकड पोलिसांनी १२ तासांत गुन्ह्याची उकल करून या प्रकरणी दिनेश याला अटक केली.  सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सहायक निरीक्षक सुभाष चव्हाण, उपनिरीक्षक अनिरुध्द सावर्डे, भारत माने, श्रेणी उपनिरीक्षक बिभीषण कन्हेरकर, पोलिस अंमलदार वंदु गिरे, नामदेव वडेकर, रामचंद्र तळपे, तात्यासाहेब शिंदे, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.   

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसwakadवाकडArrestअटकCrime Newsगुन्हेगारी